Breaking News

कोरोनाः मुंबई महानगरातील वाढत्या रूग्णांमुळे लोकलबाबत प्रश्नचिन्ह ३ हजार ३६५ नवे बाधित, ३ हजार १०५ बरे झाले तर २३ जणांचा मृत्यू

मुंबईः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासाची वेळ सर्वसामान्यांसाठी पूर्वीप्रमाणे अर्थात कार्यालयीन वेळेतही मुभा देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु होत होता. मात्र आता मुंबईसह महानगरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरीकांना कार्यालयीन वेळेत लोकल प्रवास करण्याच्या सवलतीबाबत आता पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज मुंबई शहरात ४९३ बाधित आढळले असून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आदी भागात ५० ते १०० या दरम्यान बाधित आढळून आल्याने एकूण ठाणे मंडळात ८८० रूग्ण आढळून आले आहेत. याशिवाय काही जिल्ह्यांच्या अपवाद वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येने एकेरी आकडा अर्थात १० च्या आत आढळून येत होते. आता त्यात पुन्हा वाढ होत असून दुहेरी संख्येत रूग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. तर नाशिक, औरंगाबाद, अकोला, नागपूर, पुणे, लातूर आदी मंडळांमध्ये १०० हून अधिक रूग्ण आढळून येत आहेत.
मागील २४ तासात ३,१०५ रुग्ण बरे होऊन घरी झाल्याने राज्यातील घरी जाणाऱ्यांची संख्या एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७% एवढे झाले आहे. तर राज्यात आज ३,३६५ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधितांची संख्या ३६ हजार २०१ इतकी असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज २३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ५९ हजार ०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६७ हजार ६४३ (१३.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४९३ ३१४५६९ ११४२२
ठाणे ४० ४१९१९ ९८९
ठाणे मनपा ७८ ६०७३२ १२५२
नवी मुंबई मनपा ७२ ५८२५४ १११७
कल्याण डोंबवली मनपा ८८ ६५२३८ १०४०
उल्हासनगर मनपा ११७५७ ३४६
भिवंडी निजामपूर मनपा ६८९९ ३४१
मीरा भाईंदर मनपा ३० २८१९४ ६६६
पालघर १७०५० ३२०
१० वसईविरार मनपा १५ ३१३४२ ६१८
११ रायगड १५ ३७८८६ ११ ९९०
१२ पनवेल मनपा ४३ ३१६०१ ६००
ठाणे मंडळ एकूण ८८० ७०५४४१ १६ १९७०१
१३ नाशिक ५२ ३७८३३ ७९२
१४ नाशिक मनपा ६३ ८१२०५ १०६५
१५ मालेगाव मनपा ११ ४८३२ १६४
१६ अहमदनगर ५६ ४७०२९ ७१०
१७ अहमदनगर मनपा २५ २६२१० ४०३
१८ धुळे १३ ८८१८ १८७
१९ धुळे मनपा १२ ७५१२ १५०
२० जळगाव ३० ४४८९० ११६४
२१ जळगाव मनपा २२ १३२३२ ३२८
२२ नंदूरबार ९९७० २१३
नाशिक मंडळ एकूण २८६ २८१५३१ ५१७६
२३ पुणे १०० ९४८५२ २१३६
२४ पुणे मनपा २०२ २०१५९६ ४५५६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९२ ९८६०९ १३२०
२६ सोलापूर २७ ४३५७२ १२१०
२७ सोलापूर मनपा २१ १३२६६ ६१९
२८ सातारा ७१ ५७५१४ १८३१
पुणे मंडळ एकूण ५१३ ५०९४०९ ११६७२
२९ कोल्हापूर ३४७०१ १२५७
३० कोल्हापूर मनपा १४६६४ ४१७
३१ सांगली ३३०५१ ११५८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८०२४ ६२८
३३ सिंधुदुर्ग ६५३६ १७६
३४ रत्नागिरी ३७ ११७७५ ४०४
कोल्हापूर मंडळ एकूण ६२ ११८७५१ ४०४०
३५ औरंगाबाद २० १५६९० ३२७
३६ औरंगाबाद मनपा ३६ ३४३९० ९२६
३७ जालना ४० १३७२९ ३६७
३८ हिंगोली १५ ४४८९ १००
३९ परभणी १२ ४५३३ १६४
४० परभणी मनपा १४ ३५४० १३२
औरंगाबाद मंडळ एकूण १३७ ७६३७१ २०१६
४१ लातूर १० २१७०४ ४६६
४२ लातूर मनपा ३२५६ २२५
४३ उस्मानाबाद १७७१६ ५५७
४४ बीड १६ १८५३८ ५५६
४५ नांदेड २९ ९०२३ ३८३
४६ नांदेड मनपा ४५ १३५९४ २९५
लातूर मंडळ एकूण ११० ८३८३१ २४८२
४७ अकोला २५ ४७७९ १३५
४८ अकोला मनपा ७९ ७८९० २३७
४९ अमरावती ९४ ८९६६ १८१
५० अमरावती मनपा ४०५ १७१५८ २३१
५१ यवतमाळ ५४ १६३९८ ४६०
५२ बुलढाणा १७३ १५८१७ २५०
५३ वाशिम ७५३५ १६०
अकोला मंडळ एकूण ८३७ ७८५४३ १६५४
५४ नागपूर ४५ १६४१५ ७६२
५५ नागपूर मनपा ४१५ १२४३६२ २६६८
५६ वर्धा ४२ ११४७१ ३०१
५७ भंडारा १३६७१ ३१३
५८ गोंदिया १४४५२ १७३
५९ चंद्रपूर १० १५१३४ २४६
६० चंद्रपूर मनपा ९२२३ १६४
६१ गडचिरोली ८८९२ ९९
नागपूर एकूण ५४० २१३६२० ४७२६
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ३३६५ २०६७६४३ २३ ५१५५२

आज नोंद झालेल्या एकूण २३ मृत्यूंपैकी ७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू रायगड-१०, औरंगाबाद-२ आणि  ठाणे-१ असे आहेत.

Check Also

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *