Breaking News

कोरोना: अन्य राज्यांच्या तुलनेत रुग्ण संख्या, मृत्यू दर, सक्रीय रुग्ण राज्यात कमी २ हजार ६७३ नवे बाधित, १ हजार ६२२ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी  असल्याचे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

२ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पाँडेचरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगडमध्ये १९ हजार ८७७ इतके पॉझिटीव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार ८ रुग्ण होते. महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात ६ वा होता.

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्ण संख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचे आणि करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक अंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील केले आहे. अगदी यासंदर्भातील माहिती अद्ययावत करताना पूर्वीचे जे मृत्यू कोरोनामुळे झाले होते पण त्याची नोंद झाली नव्हती अशा सुमारे हजारभर मृत्यूची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली. इतर काही राज्यांनी तर कोरोनाने मृत्यू झालेल्या पण रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेले मृत्य हे कोरोना मृत्यू म्हणून नोंद केलेले नव्हते, इतकेच नाही तर केवळ कोरोना आहे पण श्वसनाशी संबंधित लक्षणे नाहीत असे कोरोनाचे मृत्यू गृहीत धरले नाहीत.

एकूण मृत्यूंची सख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दश लक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत ६४७, गोवामध्ये ५२७, पौंडेचरीत ५२२, आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दश लक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.

कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर ३ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढता दर होता 0.10% तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहा पट जास्त म्हणजे 0.६१%, गोवा 0.२%, पंजाब 0.१२%, गुजरात आणि छत्तीसगड 0.११% असा दर होता. सक्रीय रुग्णाबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत २९०, रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आज आहेत

राज्यात आज १,६२२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,५५,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६७% एवढे झाले आहे. आज राज्यात २,६७३  नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३५ हजार ९४८ इतकी झाली. आज ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४९,७७,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,४४,०७१ (१३.६५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७२,३११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ४४८ ३११८८१ ११३९२
ठाणे ४५ ४१६४४ ९९१
ठाणे मनपा ६९ ६०१०७ १२८०
नवी मुंबई मनपा ७५ ५७६६४ १११३
कल्याण डोंबवली मनपा ७७ ६४६४१ १०३५
उल्हासनगर मनपा ११७२१ ३५२
भिवंडी निजामपूर मनपा ६८८४ ३४७
मीरा भाईंदर मनपा २६ २८०५८ ६६१
पालघर १३ १६९९५ ३२२
१० वसईविरार मनपा २३ ३१२०७ ५९८
११ रायगड ३० ३७७६२ ९४५
१२ पनवेल मनपा ४० ३१२७० ५९४
ठाणे मंडळ एकूण ८५२ ६९९८३४ १५ १९६३०
१३ नाशिक १९ ३७३८७ ७७७
१४ नाशिक मनपा ३२ ८०१२० १०६०
१५ मालेगाव मनपा ४७७४ १६४
१६ अहमदनगर ३७ ४६६०७ ७०१
१७ अहमदनगर मनपा १२ २५९७३ ४०३
१८ धुळे ८७५२ १८९
१९ धुळे मनपा ७४३५ १५५
२० जळगाव ३७ ४४६७३ ११५९
२१ जळगाव मनपा २३ १३०६१ ३२०
२२ नंदूरबार २६ ९८९५ २१२
नाशिक मंडळ एकूण २०१ २७८६७७ ५१४०
२३ पुणे १४९ ९३७८६ २१४१
२४ पुणे मनपा १९६ १९९९२१ ४५५३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०१ ९७७२८ १३१८
२६ सोलापूर २३ ४३३६५ १२१९
२७ सोलापूर मनपा २१ १३०५८ ६११
२८ सातारा १२५ ५६९३३ १८१९
पुणे मंडळ एकूण ६१५ ५०४७९१ ११६६१
२९ कोल्हापूर ३४६५७ १२५९
३० कोल्हापूर मनपा ११ १४६०८ ४१६
३१ सांगली १५ ३३००१ ११५७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२ १७९६७ ६२७
३३ सिंधुदुर्ग १४ ६४७६ १७१
३४ रत्नागिरी ११६२४ ३९३
कोल्हापूर मंडळ एकूण ७० ११८३३३ ४०२३
३५ औरंगाबाद १५५२७ ३२१
३६ औरंगाबाद मनपा ३० ३४०७० ९२४
३७ जालना १५ १३५०३ ३६४
३८ हिंगोली ४४६६ ९८
३९ परभणी ४४८६ १६२
४० परभणी मनपा ३४७९ १३५
औरंगाबाद मंडळ एकूण ६३ ७५५३१ २००४
४१ लातूर २१५६५ ४६८
४२ लातूर मनपा ३१३४ २२५
४३ उस्मानाबाद २४ १७६२६ ५५७
४४ बीड २२ १८३५५ ५५१
४५ नांदेड ८९६७ ३८३
४६ नांदेड मनपा २९ १३५०३ २९७
लातूर मंडळ एकूण १०१ ८३१५० २४८१
४७ अकोला २३ ४५७२ १३५
४८ अकोला मनपा २९ ७४७५ २३२
४९ अमरावती ५४ ८३१६ १८०
५० अमरावती मनपा १७० १४८८९ २२३
५१ यवतमाळ ६४ १५८४४ ४३७
५२ बुलढाणा २९ १५२९६ २४७
५३ वाशिम १५ ७४२४ १५९
अकोला मंडळ एकूण ३८४ ७३८१६ १६१३
५४ नागपूर ३८ १५९६७ ७३९
५५ नागपूर मनपा २७० १२१७२२ २६३७
५६ वर्धा ५७ १०९६३ ३०२
५७ भंडारा १३६२६ ३०९
५८ गोंदिया १४४११ १७४
५९ चंद्रपूर १५०५३ २४७
६० चंद्रपूर मनपा ९१७२ १६८
६१ गडचिरोली ८८७५ ९७
नागपूर एकूण ३८७ २०९७८९ ४६७३
इतर राज्ये /देश १५० ८५
एकूण २६७३ २०४४०७१ ३० ५१३१०

आज नोंद झालेल्या एकूण ३० मृत्यूंपैकी १६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १२ मृत्यू रायगड-९, पुणे-२ आणि नागपूर-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *