Breaking News

कोरोना : मुंबई आणि महानगरासह प. महाराष्ट्रात वाढ राज्यात सर्वाधिक संख्या १८ हजार १०५ नवे बाधित, १३ हजार ९८८ बरे झाले तर ३९१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

बऱ्याच दिवसांनंतर आज मुंबईत पुन्हा १५१६ रूग्णांचे निदान झाले तर मुंबई महानगरातील ठाणेसह इतर महानगरपालिकांमध्ये सरासरी ३०० हून अधिक रूग्ण आढळून आल्याने या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३३० इतकी आढळून आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा या भागातही मोठ्या प्रमाणावर संख्या आढळून आल्याने पुणे विभागात ५ हजार १२१ इतके बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे या दोन विभागातच सर्वाधिक अर्थात ९ हजार ५०० कोरोनाबाधित सापडले आहे. तर एकट्या मुंबईत आतापर्यंत १ लाख ५० हजार एकूण संख्येने संख्या ओलाडली.

आज राज्यात सर्वाधिक १८ हजार १०५ बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ८ लाख ४३ हजार ८४४ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५ हजार ४२८ वर पोहोचली आहे. याशिवाय १३ हजार ८८८ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ६ लाख १२ हजार ४८४ इतकी झाली. तर ३९१ इतक्या मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) २.५८ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.०३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४३,७२६९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८,४३,८४४ (१९.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,२७,३१६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १५२६ १५००९५ ३७ ७७६४
ठाणे २७१ २०४६३ ५३३
ठाणे मनपा ३४८ २७६२९ १३ ९८६
नवी मुंबई मनपा ३५९ २९८०२ १० ६६४
कल्याण डोंबवली मनपा ३९४ ३३२८१ ६६४
उल्हासनगर मनपा ७३ ८०४९ २९१
भिवंडी निजामपूर मनपा २० ४५६५ ३१४
मीरा भाईंदर मनपा १७५ १३४५५ ४३९
पालघर २४३ ८९२५ १५३
१० वसई विरार मनपा २०७ १७८४४ ४६८
११ रायगड ४२८ १८६६३ ५१७
१२ पनवेल मनपा २८६ १३५९७ २९६
  ठाणे मंडळ एकूण ४३३० ३४६३६८ ८२ १३०८९
१३ नाशिक १६६ १०२४३ २६६
१४ नाशिक मनपा ७०८ २९३८९ ५३८
१५ मालेगाव मनपा २४ २७२३ ११६
१६ अहमदनगर ४७३ १२८४६ १८१
१७ अहमदनगर मनपा २६५ ९५६९ १२९
१८ धुळे ३०१ ४४९५ ११५
१९ धुळे मनपा २२६ ४१५६ १०७
२० जळगाव ४१६ २२८७१ १४ ७२४
२१ जळगाव मनपा १०० ६६१७ १७६
२२ नंदूरबार ८५ २९८२ ८१
  नाशिक मंडळ एकूण २७६४ १०५८९१ ४५ २४३३
२३ पुणे १०५८ २८९२१ २३ ७६८
२४ पुणे मनपा १८७३ १०६४२८ ४७ २६५४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९७९ ५०७७३ ८१६
२६ सोलापूर ४६५ १३९५६ ११ ३७३
२७ सोलापूर मनपा ७६ ७०४१ ४३३
२८ सातारा ६७० १६०९६ २५ ३८८
  पुणे मंडळ एकूण ५१२१ २२३२१५ ११८ ५४३२
२९ कोल्हापूर ३२७ १६६०८ २५ ५१४
३० कोल्हापूर मनपा १४१ ७२१९ १९८
३१ सांगली ४६३ ७२२७ १७ २१७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३८२ ८८१३ २६७
३३ सिंधुदुर्ग ८३ १४३१ २०
३४ रत्नागिरी १३५ ४५६३ १५६
  कोल्हापूर मंडळ एकूण १५३१ ४५८६१ ५७ १३७२
३५ औरंगाबाद १०० ८३६० १३४
३६ औरंगाबाद मनपा १८६ १५५०७ ५४४
३७ जालना ९७ ४६७३ १४१
३८ हिंगोली ३३ १५९३ ४०
३९ परभणी ६६ १४३८ ४४
४० परभणी मनपा ५० १५०२ ४८
  औरंगाबाद मंडळ एकूण ५३२ ३३०७३ १५ ९५१
४१ लातूर २०२ ५१९० १७६
४२ लातूर मनपा ७० ३६४५ ११४
४३ उस्मानाबाद २९० ६६४३ १८०
४४ बीड १०० ५११३ १३१
४५ नांदेड १७६ ४६५२ १२५
४६ नांदेड मनपा १२२ ३४८८ १०९
  लातूर मंडळ एकूण ९६० २८७३१ २६ ८३५
४७ अकोला १९ १८१२ ६३
४८ अकोला मनपा ५५ २३२९ ९७
४९ अमरावती ३३ १४८० ४३
५० अमरावती मनपा १८५ ४०३२ ९७
५१ यवतमाळ १७४ ३६६६ ८२
५२ बुलढाणा १७५ ३७७४ ८१
५३ वाशिम ६४ १९२५ ३१
  अकोला मंडळ एकूण ७०५ १९०१८ १४ ४९४
५४ नागपूर २७१ ७७०९ १०१
५५ नागपूर मनपा १३४९ २४९४४ ३० ७२०
५६ वर्धा ११० १२०० १८
५७ भंडारा १३ १२५६ २३
५८ गोंदिया १७५ १८५३ २२
५९ चंद्रपूर १२३ १८४६ १०
६० चंद्रपूर मनपा ८१ ११९२
६१ गडचिरोली २१ ८८७
  नागपूर एकूण २१४३ ४०८८७ ३१ ९०४
  इतर राज्ये /देश १९ ८०० ७६
  एकूण १८१०५ ८४३८४४ ३९१ २५५८६

आज नोंद झालेल्या एकूण ३९१ मृत्यूंपैकी २६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५९ मृत्यू नागपूर -१५, पुणे -११, ठाणे -९, सांगली -५, पालघर -३, उस्मानाबाद – ३, औरंगाबाद -२, जळगाव -२, नंदूरबार -२, परभणी -२, अकोला -१ अमरावती -१, जालना – १, कोल्हापूर १ आणि सातारा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १५००९५ १२०५६१ ७७६४ ३३१ २१४३९
ठाणे १३७२४४ ११२२३२ ३८९१ २११२०
पालघर २६७६९ १९८८३ ६२१   ६२६५
रायगड ३२२६० २५७४२ ८१३ ५७०३
रत्नागिरी ४५६३ २५४९ १५६   १८५८
सिंधुदुर्ग १४३१ ७१५ २०   ६९६
पुणे १८६१२२ १२७०४६ ४२३८   ५४८३८
सातारा १६०९६ ९३९८ ३८८ ६३०८
सांगली १६०४० ८६१० ४८४   ६९४६
१० कोल्हापूर २३८२७ १७०६१ ७१२   ६०५४
११ सोलापूर २०९९७ १४९१२ ८०६ ५२७८
१२ नाशिक ४२३५५ ३१०२५ ९२०   १०४१०
१३ अहमदनगर २२४१५ १७५७० ३१०   ४५३५
१४ जळगाव २९४८८ २०७९७ ९००   ७७९१
१५ नंदूरबार २९८२ १६१८ ८१   १२८३
१६ धुळे ८६५१ ६२५२ २२२ २१७५
१७ औरंगाबाद २३८६७ १८१०१ ६७८   ५०८८
१८ जालना ४६७३ ३१२५ १४१   १४०७
१९ बीड ५११३ ३६७२ १३१   १३१०
२० लातूर ८८३५ ५५०३ २९०   ३०४२
२१ परभणी २९४० १४४८ ९२   १४००
२२ हिंगोली १५९३ १२९३ ४०   २६०
२३ नांदेड ८१४० ३७२३ २३४   ४१८३
२४ उस्मानाबाद ६६४३ ४३६४ १८०   २०९९
२५ अमरावती ५५१२ ४२०६ १४०   ११६६
२६ अकोला ४१४१ ३१४७ १६० ८३३
२७ वाशिम १९२५ १४६१ ३१ ४३२
२८ बुलढाणा ३७७४ २२८० ८१   १४१३
२९ यवतमाळ ३६६६ २१९९ ८२   १३८५
३० नागपूर ३२६५३ १७७२७ ८२१ १४१०१
३१ वर्धा १२०० ५५६ १८ ६२५
३२ भंडारा १२५६ ७१७ २३   ५१६
३३ गोंदिया १८५३ १०३३ २२   ७९८
३४ चंद्रपूर ३०३८ १३२९ १९   १६९०
३५ गडचिरोली ८८७ ६२९   २५७
  इतर राज्ये/ देश ८०० ७६   ७२४
  एकूण ८४३८४४ ६१२४८४ २५५८६ ३४६ २०५४२८

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *