Breaking News

कोरोना: आतापर्यत ६९ लाख तपासण्या तर ६ व्या दिवशीही २० हजाराच्या आत बाधित १५ हजार ५९१ नवे बाधित, १३ हजार २९४ बरे झाले ४२४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६० हजार २०३ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी फक्त १४ लाख १६ हजार ५१३ इतक्या जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज १५ हजार ५९१ नवे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ६० हजार ८७६ वर पोहोचली. तसेच १३ हजार २९४ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ११ लाख १७ हजार ७२० वर पोहोचली असून ४२४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.९१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६९,६०,२०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,१६,५१३ (२०.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,९४,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

आज नोंद झालेल्या एकूण ४२४ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८७ मृत्यू  सातारा-३२, नागपुर -१४, पुणे-७, नाशिक -६, ठाणे -५, सोलापुर -५, य़वतमाल -४, कोल्हापुर -३,  पालघर-२, चंद्रपुर -२, सांगली -२, जळगाव -१, रत्नागिरी -१, सिंधुदुर्ग -१, वर्धा -१ आणि  मध्य प्रदेश -१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *