Breaking News

कोरोनाची ६ ठिकाणी तपासणी केंद्रे : तर उपचारासाठी ५५ रूग्णालये अधिसूचित वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता, त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्या बाबत सुचित करण्यात आले होते. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात अशी तपासणी केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर; स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, जि. बीड; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,बारामती, जि. पुणे; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया या महाविद्यालयांचा यात समावेश आहे.
राज्यात ५५ विशेष रुग्णालये अधिसूचित- आरोग्य मंत्री टोपे
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे अतिरीक्त ४३५५ खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषीत केलेल्या ३० रुग्णालयातील २३०५ खाटा आणि आताच्या ४३५५ खाटा अशा राज्यात एकूण ६६६० खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शासनामार्फत कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी अधिसूचना काढल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने ३१ मार्च रोजी काढलेल्या अधिसुचनेनुसार विभागाच्या अखत्यारीतील ३० रुग्णालये विशेष उपचारासाठी घोषित केले होते. त्यानंतर पुन्हा ६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर रुग्णालय क्र.४, पालघर ग्रामीण रुग्णालय, नंदुरबार, जालना, बीड आणि नांदेड जिल्हा रुग्णालय आणि मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय अधिसूचित झाल्याने त्यामधील एकूण ६३० खाटांची उपलब्धता झाली आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, मिरज, औरंगाबाद, जळगाव आणि अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये अधिसूचित केली आहे. त्यामुळे एकूण ३७२५ खाटा कोरोना बाधीतांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *