Breaking News

प्रचंड उकडतं ना? पुन्हा एसी-कुलर सुरु करायचाय, मग हे वाचा केंद्र सरकारकडून एसी, कुलर वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: प्रतिनिधी
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अर्थात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रूग्ण सापडायला सुरुवात झाली. त्यामुळे घरात, कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या सिंगल आणि सेंट्रल एसी वापरण्यावर सुरुवातीला बंधन घालण्यात आली. मात्र आता घरात किंवा कार्यालया एसी आणि कुलरचा वापर करण्याबाबत केंद्र सरकाच्या सीपीडब्लूडीने यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत.
या मार्गदर्शक तत्वानुसार एसी वापरायचा असेल तर तो २४ ते ३० या तापमानावरच सुरु ठेवावा. तर त्याची ह्युमिडीटी ही ४० ते ७० या दरम्यान ठेवावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
मात्र जास्तीत जास्त मोकळ्या हवेत राहावे असे सूचवित आले. त्यासाठी घराचे, कार्यालयाचे दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात असा सल्लाही देण्यात आला आहे.
घरात, कार्यालयात पुरेशी मोकळी हवा खेळण्यासाठी व्हेंटीलेशनची पुरेशी व्यवस्था करावी.
एक्झॉस्ट फॅन वापरावा, जेणेकरून बंद घरात किंवा कार्यालयात अडकून राहीलेली हवा बाहेर पडेल.
घराच्या हवेतील निजंतूर्गिकरणासाठी सॅनिटेशनचा वापर सातत्याने करावा.
शाररीक अंतर पाळावे, मास्कचा वापर करावा, हवेच्या थेट फ्लोमध्ये येण्याचे टाळा.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *