Breaking News

कोरोना: बरे होण्याचे प्रमाण वाढले तरी मृत आणि नव्या रूग्णांच्या संख्येत वाढच ३८२७ नवे रूग्ण तर १४२ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार वर

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या संख्येत चांगल्यापैकी वाढ होत असली तरी दैंनदिन मृतकांच्या आणि रूग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड बनत चालले आहे. मागील २४ तासात १४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली तर नवे ३ हजार ८२७ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार ६५१ वर पोहोचली असून एकूण मृतकांची संख्या ५ हजार ८९३ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५०.४९ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ४.७४ %. सध्या राज्यात ५,९१,०४९ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू – राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे १२४ मुंबई -११४, ठाणे -२, वसई विरार – ५, रायगड -३
नाशिक नाशिक -३, धुळे -३, जळगाव – ३
पुणे सोलापूर -१
औरंगाबद औरंगाबाद – ८

 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६४१३९ ३२२६४ ३४२५ २८४४२
ठाणे २२०३३ ९२८४ ६७५ १२०७३
पालघर ३०२९ १०१६ ८८   १९२५
रायगड २२६७ १४६९ ८९ ७०७
रत्नागिरी ४७४ ३२७ १८   १२९
सिंधुदुर्ग १६१ ११४   ४४
पुणे १४७०४ ८०२० ६१०   ६०७४
सातारा ८१० ५४१ ३४ २३४
सांगली २७४ १५२ ११   १११
१० कोल्हापूर ७३७ ६६१   ६८
११ सोलापूर २११३ ९५३ १८५   ९७५
१२ नाशिक २५१५ १४२२ १३७   ९५६
१३ अहमदनगर २६१ २०४ १२   ४५
१४ जळगाव २११८ १०७५ १७९   ८६४
१५ नंदूरबार ८३ ३६   ४१
१६ धुळे ४७९ ३१८ ५४ १०६
१७ औरंगाबाद ३१६४ १७१३ १७६   १२७५
१८ जालना ३२७ २२६ १२   ८९
१९ बीड ८२ ५६   २४
२० लातूर २०९ १३० १३   ६६
२१ परभणी ८३ ७३  
२२ हिंगोली २४३ २०३   ३९
२३ नांदेड २७१ १६६ १२   ९३
२४ उस्मानाबाद १६६ १२५   ३३
२५ अमरावती ४०५ २७३ २७   १०५
२६ अकोला ११४५ ७०८ ५६ ३८०
२७ वाशिम ६७ ११   ५३
२८ बुलढाणा १५४ ९२   ५७
२९ यवतमाळ २२२ १५६   ६१
३० नागपूर ११९१ ७८१ १३   ३९७
३१ वर्धा १४ ११  
३२ भंडारा ७१ ४१   ३०
३३ गोंदिया १०१ ६९   ३२
३४ चंद्रपूर ५८ ४०   १८
३५ गडचिरोली ५२ ४३  
  इतर राज्ये/ देश १०९ २०   ८९
  एकूण १२४३३१ ६२७७३ ५८९३ १४ ५५६५१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *