Breaking News

कोरोना: आतापर्यतची सर्वाधिक मृतकांच्या संख्येची नोंद २ हजार ७८६ नव्या रूग्णांची नोंद तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर

मुंबई: प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या बरे होवून गेलेल्या रूग्ण संख्येपेक्षा जास्त असायची. मात्र आज विक्रमी ५ हजार रूग्णांना घरी पाठविण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५६ हजारावर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारावर आली आहे. मात्र आज पर्यंतच्या सर्वाधिक संख्यांना मागे टाकत मृतकांची तब्बल १७८ वर पोहोचली असून राज्याने ४ हजार १ मृतक संख्येचा आकडा पार केला. तर २७८६ नव्या रूग्णांचे निदान होत एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची ५० हजारावर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सर्वाधिक रूग्णांचा मृत्यू हा मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांचा असून १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण मृतकांची संख्या २२५० तर राज्यातील मृतकांची संख्या ४ हजार १२८ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ५०.६१ %एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.७० %. सध्या राज्यात ५,८९,१५८ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात१५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८०,६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८,०८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू–राज्यात १७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे १४३ मुंबई -६८, वसई विरार – २०, मीरा भाईंदर – १३, नवी मुंबई -१२, ठाणे -१२ ,  पनवेल -७, कल्याण डोंबिवली – ९,  पालघर – १, रायगड -१.
पुणे १६ पुणे  -१४, सोलापूर -२.
नाशिक १६ धुळे – १३, जळगाव – ३
कोल्हापूर रत्नागिरी -१
औरंगाबाद  जालना – २

 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ५९२९३ ३०१२५ २२५० २६९१०
ठाणे १८७३२ ७८९० ४८० १०३६१
पालघर २४७६ ७१४ ७१   १६९१
रायगड १९३२ १२४७ ७२ ६११
रत्नागिरी ४३५ २९० १७   १२८
सिंधुदुर्ग १५६ ८३   ७३
पुणे १२४१९ ७२७९ ४९४   ४६४६
सातारा ७५२ ४६१ २८   २६३
सांगली २४६ १२५   ११४
१० कोल्हापूर ७२९ ५३२   १८९
११ सोलापूर १८८९ ६९० १३३   १०६६
१२ नाशिक २००६ १२१४ १०४   ६८८
१३ अहमदनगर २४६ १६६   ७१
१४ जळगाव १७८३ ७३० १३५   ९१८
१५ नंदूरबार ६६ ३२   ३०
१६ धुळे ४३३ २२३ ३९ १७०
१७ औरंगाबाद २७८६ १५१६ १३५   ११३५
१८ जालना २८० १७१   १०१
१९ बीड ७५ ४९   २४
२० लातूर १८१ १२१   ५२
२१ परभणी ८२ ७१  
२२ हिंगोली २४२ १८७   ५४
२३ नांदेड २४१ १६१ १०   ७०
२४ उस्मानाबाद १५० ११३   ३२
२५ अमरावती ३५१ २५८ २१   ७२
२६ अकोला १०२६ ५६८ ४२ ४१५
२७ वाशिम ५३   ४३
२८ बुलढाणा १२५ ७७   ४५
२९ यवतमाळ १९० १३७   ५०
३० नागपूर १०४६ ६२४ १२   ४१०
३१ वर्धा १४  
३२ भंडारा ५० ४१  
३३ गोंदिया ७१ ६९  
३४ चंद्रपूर ५० २८   २२
३५ गडचिरोली ४९ ४१  
  इतर राज्ये/ देश ८९ २०   ६९
एकूण ११०७४४ ५६०४९ ४१२८ १३ ५०५५४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *