Breaking News

बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी वर उपचार, वकीलाची विशेष न्यायालयात माहिती पीएनबी बँक घोटाळा प्रकरणः मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ?

पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिऱ्याची व्यापारी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याचा संशय आहे सध्या तो कर्करोगावर बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची माहिती वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला दिली.

मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. चौक्सी सध्या वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियममध्ये आहे. त्याच्या काही आरोग्यविषयक समस्यांची माहिती न्यायालयाला देण्यासाठी अर्ज करण्याची परवानगीही चोक्सीच्या वतीने उपस्थित वकील विजय अग्रवाल यांनी न्यायालयाकडे मागितली. एफईओ घोषणेमुळे सरकारला गुन्हेगाराची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करण्याची परवानगी मिळते.

पंजाब नॅशनल बँकेला १३,४०० कोटींना गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबकबिल्यासह देशातून पसार झाले आहेत. यांच्याविरोधात ईडीने पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही चोक्सी भारतात येऊन न्यायालय आणि तपासयंत्रणेपुढे हजर न झाल्यामुळे तपासयंत्रणेने साल २०१८ च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आणि कायद्यानुसार चोक्सीची जप्त केलेल्या सर्व संपत्तीवर टाच आणली. दुसरीकडे, याप्रकरणी चोक्सीविरोधात तीन आरोपपत्रही दाखल कऱण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *