Breaking News

कोरोनाच्या लढ्यासाठी मंत्रालयातल्या अधिकाऱ्याची अशीही दर्यादीली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजाराचा वैयक्तीक सहभाग

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रासह देशावर आलेल्या कोरोना आजाराच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्रालयातील कार्यासन अधिकारी विष्णू पाटील यांनी तब्बल ५१ हजार रूपयांची वैयक्तीक मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली.

यासंदर्भातील ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे त्यांनी हस्तांतरीत केला. पाटील हे मंत्रालय राजपत्रित अधिकारी संघटनेचे पदाधिकारी असून त्यांच्या या कृतीचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्याच्याप्रमाणे राज्यातील इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत स्वत:चे योगदान द्यावे यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *