Breaking News

कोरोना प्रभाव: रोजगारबाधीतांच्या मध्यान्ह भोजनासाठी देह व्यापारातील महिलांची मदत स्नेहालय - अनाम प्रेम परिवाराच्या पुढाकाराने १२३० कुटुंबियांना भोजन

अहमदनगर: प्रतिनिधी
कोरोनामूळे अहमदनगर मधील झोपडपट्ट्यातील रोजगारबाधीत १२३० कुटुंबांना  मध्यान्ह भोजन देण्यात स्नेहालय – अनाम प्रेम परिवाराने  पुढाकार घेतला. यासाठी येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी मदतीचा हात देत  ७ हजार रूपयांची मदत देत एक अनोखा आदर्श समाजापुढे निर्माण केला.

नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना पासून बचाव करण्याबाबत सर्व काळजी घेण्याची सूचना करून या पथदर्शी उपक्रमाला समर्थन दिले. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम विविध संस्था संघटनांनी आपापल्या क्षेत्रात राबवावा, यासाठी प्रचार मोहीमही राबवली जाणार असल्याचे बालभवन प्रकल्पाचे मानद संचालक आणि अहमदनगर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, स्नेहालयाचे सहसंचालक अनिल गावडे , प्रवीण मुत्याल, यशवंत कुरापत्ती,जया जोगदंड, वैजनाथ लोहार यांनी आज सांगितले.
संजयनगर तसेच काटवण खंडोबा झोपडपट्टी  परिसरातील १२३० नागरिकांच्या भोजनाची सोय आज दुपारी करण्यात आली. देह व्यापारातील बळी महिलांनी स्वतःच्या  शिलकीतून  आजच्या मध्यान्ह भोजनाची ७ हजार रुपयांची शिधा दिली. सध्यातरी या उपक्रमात केवळ विविध भाज्या टाकलेल्या पौष्टीक  डाळ – तांदूळ खिचडीचा  समावेश आहे.
सामाजिक जाणीव जपणाऱ्या नागरिकांनी अन्नधान्याचा सहयोग दिला ,तर यात इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करून नगर मधील विविध १७ अधिकृत झोपडपट्टीत राहणाऱ्या ४५००० नागरिकांसाठी ही योजना राबविण्याची स्नेहालय परिवाराचां प्रयत्न आहे. काही गरीब परिवारांना या उपक्रमांतर्गत कोरडी शिधा देखील पुरवली जाणार आहे.

गरिबांना रोजगार किंवा जेवण न मिळाल्यास पुढील आठवड्यात उपाशी शहरी गरीब सर्व बंधने झुगारून रस्त्यावर उतरण्याची भीती सामाजिक संस्थांना वाटते आहे. या अराजका ला टाळण्यासाठी शासनाने सोबतच समाजाचे सक्रिय प्रयत्न विशेष महत्त्वाचे ठरू शकतात, असेही सामाजिक संस्थांना आणि संघटनांना वाटते आहे.
मागील चार दिवसांपासून अहमदनगर मध्ये कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्व शहर बंद ठेवले आहे. संजयनगर झोपड़पट्टी येथे राहणारे  कुष्टरोगी परीवार,भिक्षेकरी , हातावर पोट भरणारी, कष्टकरी माणसांसोबत आज सकाळी ११ वाजता एक संवाद करण्यात आला.
येथील 1230 परीवार अक्षरश: उपाशी असल्याचे दिसून आले.  हे लोक मागील ४ दिवसांपासून घरिच असल्यामुळे यांचा किराना आणि पैसे पूर्णपणे संपले आहेत. “बाहेर कामाला जाता येई ना, व घरी पोरांचे तोंड पहावेना” अशी बिकट अवस्था झाली असल्याचे शबाना शेख, जयश्री शिंदे या झोपडपट्टीतील स्नेहालय परिवाराच्या बालभवन प्रकल्पाच्या संघटकांनी नमूद केले.
आजचा प्रश्नतर मिटला पण उदयाचे काय…, असा प्रश्न येथील लोक विचारत होते.
याशिवाय रामवाडी, बारस्कर नगर ,सिद्धार्थ नगर ,बोरकर नगर, कोटला मैदान याठिकाणी झोपडपट्ट्यात लोकांच्या भेटीगाठी घेतल्यावर हाच प्रश्न लोक विचारत होते.  सध्याची संचारबंदी ३१ मार्च पर्यत चालणार आहे. या शहरी गरीब, कष्टकरी लोकाना रोजगार किंवा जेवण तातडीने न मिळाल्यास सर्व बंधने मराठी या लोकांकडून झुगारली जाण्याची भीती आहे .   झोपडपट्टी मधील प्रत्येकी एका  कुटुंबाची जवाबदारी प्रत्येक सक्षम कुटुंबाने उचलावी ,  त्यांना कोरडा शिधा  दिला ,
तर  या संकटाचा मुकाबला आपण सर्वजण मिळून  करू शकतो.
या उपक्रमासाठी प्रत्येक सक्षम व्यक्ती आणि परिवाराने  रुपये १०००/- (एक हजार मात्र)  अथवा अन्नधान्याच्या स्वरूपातील मदत देण्याचे आवाहन स्नेहालय – अनाम प्रेम परिवाराने केले आहे. या उपक्रमासाठी च्या बँक खात्याचे तपशील पुढील प्रमाणे आहेत.

Snehalaya Bank a/c.
Bank Name: HDFC Bank,
Branch name: Market Yard Branch,
Account Number : 01811000053339
Name of Account (Cheque to be made in the name of): Snehalaya ,

9 digit MICRnumber: 414002001 ,
Current account ,
RTGS/IFSC Code: HDFC0000181,
सध्या ऑनलाइन मदत पाठवणे ,हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
तथापि आपण स्नेहालय हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यास स्नेहालयाचे कार्यकर्ते आपल्याकडे येऊन धनादेश अथवा धान्य घेऊन जाऊ शकतात . अन्नधान्याची मदत स्वीकारण्याची व्यवस्था डॉक्टर अाडकर संकुल ,लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर , आणि स्नेहालय भवन, महात्मा गांधी मैदान, अहमदनगर, येथे करण्यात आली आहे.
स्नेहालयच्या युवानिर्माण प्रकल्पाचे कार्यकर्ते  अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेत असल्याचे समन्वयक विशाल आहिरे यांनी नमूद केले.

हेल्पलाइन संपर्क क्रमांक
(राजू पांढरे -९९२१३७२७३८  )
(शबाना शेख-९०११०२६४९८),  

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *