Breaking News

मंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरो… इस्लामपूरच्या 'त्या' परिसराचा घेतला आढावा

सांगली: प्रतिनिधी
आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे असे सांगत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना बाधित इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली.
इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळल्याने सांगलीचे पालकत्व स्वीकारलेल्या जयंत पाटील यांनी न डगमगता खंबीरपणे परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली.  इतकेच नव्हे तर जेथे कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या इस्लामपूर परिसरात जाऊन पाहणी केली व आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. शिवाय नागरिकांनी घाबरून जावू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि घरातच रहावे असे आवाहनही केले.
मागील वर्षी आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले होते. त्यावेळीही जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्राऊंड झिरोवर जाऊन पूरग्रस्तांची मदत केली होती.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *