Breaking News

कोरोनापासून बचाव करायचाय तर हात मिळवू नका, हात स्वच्छ धुवा मुख्यमंत्री, आरोग्य सचिव प्रदीव व्यास, आयुक्त परदेशींची माहिती

मुंबईः प्रतिनिधी

राज्यात करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हात स्वच्छ धुवणे, हात मिळविण्याचे टाळावे, कोणाशीही बोलताना किमान तीन फुटाचे अंतर ठेवावे, शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल धरणे आदी सहजसाध्य गोष्टींमुळे या आजारापासून स्वतःचा बचाव करता येणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले.

या आजाराची तपासणी करण्यासाठी मुंबईतील कस्तुरबा रूग्णालय, पुणे येथील राष्ट्रीय संशोधन केंद्र, नागपूर येथील इंदिरा वैद्यकीय महाविद्यालय या तीन ठिकाणी केंद्रे सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हा व्हायरस अर्थात विषाणू भारतीय लोकांसाठी नवा नाही. यापूर्वीही हा विषाणू भारतात येवून गेलेला आहे. या विषाणूमुळे ताप येणे, कोरडा कफचा खोकला येणे, अशक्तपणा जाणवणे, नाक सतत वाहणे आदी लक्षणे या आजाराची असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी ७ ते १० किंवा १४ दिवस काळजी घेणे गरजेचे असून पुरेशी काळजी घेतल्यास हा आजार पूर्ण होत असल्याचे सांगत या आजाराची लागण ५० वयोगटापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना लवकर होत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

मुंबईत काळजीचा एकभाग म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या तपासणीसाठी ५० डॉक्टर रोटेशन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कस्तुरबा रूग्णालयाबरोबरच जसलोक, कोकीलाबेन, बीपीटी, फोर्टीस, सैफी हॉस्फीटल्स, बाँम्बे हॉस्पीटल्स, सेव्हन हिल्स हॉस्पीटल्स यासह अन्य रूग्णालयात आयसेलेशन वार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिली.

या आजाराचा रूग्ण आढळल्यास १९१६, २६१२७३९४ पुणे या दोन हेल्पलाईन नंबरवर फोन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *