Breaking News

कोरोना: आतापर्यंतची सर्वाधिक मृतकांची नोंद ६६ हजार १९१ नवे बाधित, ६१ हजार ४५० बरे झाले तर ८३२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील वर्षभराहून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतकांची नोंद झाली नव्हती. तितकी नोंद आज पहिल्यांदाच राज्यात झाली असून तब्बल ८३२ मृतकांची नोंद झाली असून ही नोंद सर्वाधिक आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यातील बाधितांचे प्रमाण सातत्याने ६० हजाराहून अधिक असले तरी बरे होवून घरी जाणाऱ्यांचे प्रमाणही त्याच प्रमाणात आहेत. मागील २४ तासात ६६ हजार १९१ इतके बाधित आढळून आल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ९८ हजार ३५४ इतकी झाली आहे. तर ६१ हजार ४५० रुग्ण बरे झाल्याने राज्यात घरी जाणाऱ्यांची संख्या ३५ लाख ३० हजार ०६० वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१९ एवढे झाले आहे.

राज्यात आज ८३२  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५७ लाख ४९ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२ लाख ९५ हजार ०२७ (१६.६८) टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ लाख ३६ हजार ८२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,९६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २२८ मृत्यू, पुणे-५३, औरंगाबाद-४३, नाशिक-२७, नांदेड-२३, सोलापूर-१८, अहमदनगर-१६, ठाणे-१५, नागपूर-१२, चंद्रपूर-६, रायगड-४, सिंधुदुर्ग-३, जळगाव-२, गडचिरोली-१, जालना-१, परभणी-१, रत्नागिरी-१, सांगली-१ आणि भंडारा-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५४९८ ६२७६४४ ६४ १२७९०
ठाणे १६५५ ७९१२२ १३ १०९१
ठाणे मनपा १०८७ ११७८१८ १४७२
नवी मुंबई मनपा ५९९ ९८६८१ १२८४
कल्याण डोंबवली मनपा १४२५ १२२९३९ २१ १२४३
उल्हासनगर मनपा ११६ १८४९१ ३९८
भिवंडी निजामपूर मनपा ७२ ९९८५ ३८०
मीरा भाईंदर मनपा ५६७ ४५२७२ ७७१
पालघर ६६५ ३०५८० ३४५
१० वसईविरार मनपा ९०० ५०९५२ ८७३
११ रायगड १०५२ ५९७५६ २३ १२०३
१२ पनवेल मनपा ६६० ५४६५९ ११ ७७५
ठाणे मंडळ एकूण १४२९६ १३१५८९९ १४४ २२६२५
१३ नाशिक १७२७ ९६०४५ २९ १२०२
१४ नाशिक मनपा ३०५१ १७८२६७ २८ १४६९
१५ मालेगाव मनपा ३० ७७५४ १९४
१६ अहमदनगर २३७४ १०६६३९ २८ ११३२
१७ अहमदनगर मनपा ९०१ ४९४६१ १६ ६५२
१८ धुळे १८४ २०३९४ २३९
१९ धुळे मनपा ९५ १५८७२ १९५
२० जळगाव ७४० ८५९६८ १२ १४०३
२१ जळगाव मनपा १२० २७५२९ ४३६
२२ नंदूरबार ७१५ ३१३०८ ४६०
नाशिक मंडळ एकूण ९९३७ ६१९२३७ १२० ७३८२
२३ पुणे ३२७६ १९०३२८ १५ २३९६
२४ पुणे मनपा ४६५३ ४१०६८३ ४७ ५१५८
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२४५ १९५६३४ १४६६
२६ सोलापूर १६३६ ७११९७ ३४ १४५७
२७ सोलापूर मनपा ३३९ २५२९३ २८ ८७१
२८ सातारा १८७९ ९३२६६ १० २१३९
पुणे मंडळ एकूण १४०२८ ९८६४०१ १४१ १३४८७
२९ कोल्हापूर ७३९ ४२७१२ १३००
३० कोल्हापूर मनपा २१० १८७७२ ४५३
३१ सांगली ९१६ ४८९४३ १४ १२७५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३०० २३६०० ७०४
३३ सिंधुदुर्ग २३४ ११५६२ १० २७५
३४ रत्नागिरी ६४८ १९६६४ १६ ४९९
कोल्हापूर मंडळ एकूण ३०४७ १६५२५३ ४२ ४५०६
३५ औरंगाबाद ९०० ३७२६४ ४२९
३६ औरंगाबाद मनपा ९५३ ८१०३१ ३९ ११८९
३७ जालना ६८८ ४०४९९ १७ ५७७
३८ हिंगोली २५१ १२४०५ १४७
३९ परभणी ६९५ १७५४१ २७९
४० परभणी मनपा १४९ १४०३९ २४४
औरंगाबाद मंडळ एकूण ३६३६ २०२७७९ ७५ २८६५
४१ लातूर ११५४ ४७९६१ १७ ६७६
४२ लातूर मनपा ३१३ १७८४६ ३३८
४३ उस्मानाबाद ८३२ ३५३५६ २० ८२७
४४ बीड १२५४ ४८१९३ ८२१
४५ नांदेड ७०२ ३७२०२ ४४ ८२४
४६ नांदेड मनपा ३८९ ४००८१ १५ ६६७
लातूर मंडळ एकूण ४६४४ २२६६३९ १०८ ४१५३
४७ अकोला १६१ १४०२९ २०५
४८ अकोला मनपा २४८ २४४३९ ३९०
४९ अमरावती ४३३ २४१०९ १४ ४२८
५० अमरावती मनपा २७२ ३६५७० ४०१
५१ यवतमाळ १५३९ ४३८८३ ४५ ८०७
५२ बुलढाणा ३९२ ४०२४९ ३५५
५३ वाशिम ३६९ २५२१३ २३७
अकोला मंडळ एकूण ३४१४ २०८४९२ ७६ २८२३
५४ नागपूर २८१६ ८६७५४ ६९ ११९४
५५ नागपूर मनपा ५१३२ २९८६९४ ३६३७
५६ वर्धा ९६० ३७८७० ४८६
५७ भंडारा १३६४ ४५४२५ ४२१
५८ गोंदिया ६२७ २९८८० १० ३१२
५९ चंद्रपूर १२६० ३५५१० १९ ३७६
६० चंद्रपूर मनपा ५६३ १८७४२ २१६
६१ गडचिरोली ४६७ १७३०६ १५९
नागपूर एकूण १३१८९ ५७०१८१ १२६ ६८०१
इतर राज्ये /देश १४६ ११८
एकूण ६६१९१ ४२९५०२७ ८३२ ६४७६०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *