Breaking News

कोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यात पुन्हा विस्फोट ४० हजार ४१४ नवे बाधित, १७ हजार ८७४ बरे झाले तर १०८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील चार ते पाच दिवसांपासून ३० हजार ते ३६ हजारादरम्यान असलेल्या कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येचा विस्फोट झाला असून तब्बल ४० हजारापार बाधित आढळून आले. तर मुंबईत जवळपास ७ हजार रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहर व ग्रामीण मध्येही १८०० हून अधिक, कल्याण-डोंबिवलीत एक हजारापार आणि इतर महानगरपालिकांच्या हद्दीतील मिळून एकूण १२ हजार ३१९ रूग्ण आढळून आले.

नाशिक शहर व ग्रामीण मध्ये ३ हजार ५०० हून अधिक, पुणे शहर व ग्रामीण मध्ये ६ हजाराहून अधिक, पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजाराहून अधिक बाधित, औरंगाबादेत १२०० हून अधिक तर नागपूर शहर व ग्रामीण मध्ये ४ हजाराच्या घरात बाधित आढळून आले आहेत. कोल्हापूर मंडळातील चार जिल्ह्यात मात्र कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव अद्यापही झालेला दिसत नाही.

मागील २४ तासात १७,८७४ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.९५% एवढे झाले आहे. तर राज्यात ४० हजार ४१४ बाधित आढळून आल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख २५ हजार ९०१ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज १०८  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६९३३ ३९८७२४ ११६५३
ठाणे ६१४ ४९७७६ १०१३
ठाणे मनपा १२१७ ७६०७० १२५५
नवी मुंबई मनपा ८१५ ६९१३४ ११८२
कल्याण डोंबवली मनपा १०८१ ८१०२३ ११०६
उल्हासनगर मनपा २१२ १३५७४ ३६७
भिवंडी निजामपूर मनपा ६४ ७६५१ ३४२
मीरा भाईंदर मनपा २७१ ३१८७४ ६७८
पालघर १६६ १८७५७ ३२१
१० वसईविरार मनपा ३२४ ३४४१२ ६४७
११ रायगड २५२ ४११४८ १०११
१२ पनवेल मनपा ३७० ३८००३ ६३४
ठाणे मंडळ एकूण १२३१९ ८६०१४६ १६ २०२०९
१३ नाशिक ११५९ ५१९८६ ८६८
१४ नाशिक मनपा २४०३ ११०४५३ ११४०
१५ मालेगाव मनपा ५१ ६८३३ १७५
१६ अहमदनगर ८३१ ५८५४३ ७६६
१७ अहमदनगर मनपा ३८० ३१५२४ ४२५
१८ धुळे ६२४ १२६८१ १९१
१९ धुळे मनपा २२३ ११९२७ १५१
२० जळगाव ७३९ ६०९०२ १२२४
२१ जळगाव मनपा १८५ २१८१८ ३५९
२२ नंदूरबार १७८ १६७३९ ११ २७७
नाशिक मंडळ एकूण ६७७३ ३८३४०६ १८ ५५७६
२३ पुणे १५६८ ११९३८६ २२०६
२४ पुणे मनपा ४६२५ २६६८७५ ४७०५
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१३१ १३०१९४ १३६९
२६ सोलापूर ३९५ ४८३६९ १२५२
२७ सोलापूर मनपा २०० १६९१० ६४४
२८ सातारा ४०० ६४४७० १८८१
पुणे मंडळ एकूण ९३१९ ६४६२०४ २१ १२०५७
२९ कोल्हापूर ३६ ३५५०२ १२६४
३० कोल्हापूर मनपा ३८ १५५०५ ४२६
३१ सांगली १३२ ३४७४० ११७१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ८० १९०४४ ६४३
३३ सिंधुदुर्ग ७१ ७१६३ १८५
३४ रत्नागिरी २४ १२८८९ ४२९
कोल्हापूर मंडळ एकूण ३८१ १२४८४३ ४११८
३५ औरंगाबाद १९५ २२३४२ ३६१
३६ औरंगाबाद मनपा १०३१ ५७९१० ९७७
३७ जालना ३४९ २२३३९ ४०२
३८ हिंगोली ८१ ६५८९ १००
३९ परभणी १३४ ६५८६ १७९
४० परभणी मनपा १९६ ६३१६ १५९
औरंगाबाद मंडळ एकूण १९८६ १२२०८२ २१७८
४१ लातूर २३९ २४८५९ ४९१
४२ लातूर मनपा २४६ ६८२७ २४३
४३ उस्मानाबाद २३७ २०४७२ ५८५
४४ बीड २९७ २४९२१ ६०४
४५ नांदेड ४४१ १५०७१ ४०७
४६ नांदेड मनपा ७७० २४८३७ ३३२
लातूर मंडळ एकूण २२३० ११६९८७ २६६२
४७ अकोला २०० १०२३७ १६२
४८ अकोला मनपा २८० १७४०० २९६
४९ अमरावती ३१६ १६६१३ २८१
५० अमरावती मनपा १९४ ३१६५१ ३५४
५१ यवतमाळ ३४८ २७४९४ ५२४
५२ बुलढाणा ३०४ २६८१२ २८०
५३ वाशिम ४२६ १५३६१ १८४
अकोला मंडळ एकूण २०६८ १४५५६८ १४ २०८१
५४ नागपूर १०१८ ३५४६७ ८७३
५५ नागपूर मनपा २९८१ १८७१४६ १५ २९२०
५६ वर्धा ३७० २०५९५ ३६७
५७ भंडारा ४२५ १७०२५ ३१८
५८ गोंदिया १०३ १५७६३ १७९
५९ चंद्रपूर २८२ १७८१६ २६५
६० चंद्रपूर मनपा ११७ १०७६१ १७५
६१ गडचिरोली ४२ ९९२० १०९
नागपूर एकूण ५३३८ ३१४४९३ २२ ५२०६
इतर राज्ये /देश १४६ ९४
एकूण ४०४१४ २७१३८७५ १०८ ५४१८१

आज नोंद झालेल्या एकूण १०८ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू अकोला-५, पुणे-३, सोलापूर-३, ठाणे-३, वाशिम-२, नंदुरबार-१, कोल्हापूर-१, जालना-१ आणि नागपूर-१ असे आहेत.

 

Check Also

म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *