Breaking News

खबरदार, मास्क, सँनिटायझरची साठेबाजी आणि काळाबाजार कराल तर जीवनाश्वक कायद्याखाली कारवाईचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारच्या १३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क (२ प्लाई व ३ प्लाई सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. या दोन वस्तुंचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
तसेच जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम १९८० मधील तरतुदीनुसार करण्यात येणार असून जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसेच संबंधित व्यक्ती, संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्यस्थितीत राज्यात करोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने जनतेस जीवनावश्यक वस्तु सहजासहजी व रास्तभावात उपलब्ध होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा असल्याचे भासवून त्याचा साठा करणे व तो चढ्या भावाने विक्री करणे अशी परिस्थिती उद्‌भवल्याचे निदर्शनास येत असल्यास जीवनावश्वक वस्तु अधिनियम, 1955 व त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *