Breaking News

LOCKDOWN- एक संधी मानसशास्त्रज्ञ संध्या काळे यांचा खास लेख

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आपल्या आजूबाजूला सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. हा संसर्ग लवकर कमी व्हावा असे वाटत असेल तर सर्वांनीच कसोशीने प्रयत्न करायला हवेत. “सोशल डिस्टनसिंग “, पर्सनल हायजिन , फार महत्त्वाचे आहे . एक मानसशास्त्रज्ञ म्हणून सांगायचे झाले तर या “लॉकडाऊन” कडे  संकट कमी आणि संधी जास्त असे पहायला हरकत नाही. कारण या बिकट अवस्थेत आपण कसे स्वयंशिस्तीचे पालन करतो , देशाच्या , समाज्याच्या आरोग्याचा व मानसिकतेचा कसा विचार करतो समाजाप्रती असलेली कर्तव्ये कशी निभावतो यांचे आत्मपरिक्षण केल्यास ही संचारबंदी बंधन वाटणार नाही, तर यामुळे आपल्यावर  जो मानसिक, शारीरिक व भावनिक पातळीवर जो ताण आलेला आहे तो कमी होण्यास मदत होईल.

आता यादरम्यान जो वेळ मिळाला आहे, त्यामध्ये काही निरर्थक करण्यापेक्षा चित्रकला, कविता, लेखण करने अशा गोष्टी करून आपल्यामधील सुप्त गुण समजून घेऊन त्यावर काम करता येईल‌. सुट्टी आहे म्हणून सतत झोपून राहणे ,टिव्ही , मोबाईल मध्ये व्यस्त राहणे , लहान मुलांना मोबाइल देऊन गप्प बसवण्याऐवजी त्यांना गोष्टी सांगा व त्यांचा अभिप्राय घ्या ,त्यांच्यासोबत खेळा त्यातून मुलांची ऐकण्याची, बोलण्याची , आणि समजून घेण्याची क्षमता लक्षात येईल.

तसेच या काळात संयम ठेवणे फार महत्त्वाचे आहे. संयम म्हणजे वाट पाहणे नव्हे तर जिद्द, डोळस साहस , कृतीशिलता यांचे मिश्रण म्हणजे संयम. या कोरोना व्हायरसमुळे समाजात अनेक मानसिक बदल होताना दिसत आहेत. या काळात आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे‌.  “स्वयं विलगीकरण, आहार , व्यायाम आणि पुरेशी झोप महत्त्वाची  आहे .

या संचारबंदीमुळे पुर्ण आयुष्य थांबलेलं आहे, स्वातंत्र्यावर पुर्ण विराम लागलाय,  तसेच या साथीच्या रोगामुळे मला व माझ्या कुटुंबाला काही धोका तर नाही होणार असे   नकारात्मक विचार अस्वस्थ करणारच. या ऐवजी हा वेळ म्हणजे एक स्वल्पविराम आहे व स्वता:ला आणि  आपण करत असलेल्या कामाचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे समजून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. आपण या वेळेत आपल्यामधील उत्पादक कार्यक्षमता वाढवली पाहिजे याचा अर्थ फक्त आर्थिक फायद्याचा नाही तर जे काम करण्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल आणि समाधान वाटेल.

“Self realisation is the ultimate knowledge”

हे सत्य समजून घेण्यासाठी आपणास मुबलक वेळ मिळाला आहे. स्वता::बद्दल आकलन जितके जास्त होईल तितका आत्मविश्वास वाढेल. आपल्या मध्ये निर्माण होणाऱ्या भावना समजून त्या योग्य कि अयोग्य याचा विचार केल्याने स्वता:ची ओळख होईल. या सर्व गोष्टींमुळे आपण स्वता: बरोबरच सर्व मानवजातीचा विचार करायला सक्षम झालो आहोत हे समजेल. या साथीच्या रोगापासून आपला समाज लवकरच सुरक्षित बाहेर पडेल व आपण भयमुक्त होऊन आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी स्वता:ची नवीन ओळख जी पुर्णपणे  सकारात्मक असेल असं व्यक्तिमत्व तयार होईल.

संध्या काळे, मानसशास्त्रज्ञ, सोलापूर

7016631183

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

One comment

  1. अर्जुन काळे

    खरच खूप छान असा लेख लिहिला आहे वहिनी , अगदी असंच छान वाचायला मिळो हिच इच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *