Breaking News

कोरोना: एक वर्षानंतर सर्वाधिक रूग्ण आज महाराष्ट्रात ३१ हजार ८५५ नवे बाधित, १५ हजार ९८ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाबाजूला मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान राबविले जात असताना दुसऱ्याबाजूला लसीकरणामुळे कोरोना बाधितांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात ३० हजार इतकी सर्वाधिक संख्या नोंदविल्यानंतर पुन्हा राज्यातील बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत असतानाच आज थेट ३१ हजार ८५५ कोरोनाबाधित राज्यात आढळून आले. आतापर्यतची संख्या ही सर्वाधिक आहे.

मागील २४ तासात १५,०९८ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख ६२ हजार ५९३  इतकी रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.२१ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ३१,८५५  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ४७ हजार २९९ वर पोहोचल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८७,२५,३०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,६४,८८१ (१३.७० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,६८,०९४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,४९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५१९० ३७४६४१ ११६१०
ठाणे ४६४ ४७६९३ १०१०
ठाणे मनपा ८२७ ७१९१४ १२५४
नवी मुंबई मनपा ५६६ ६६०४२ ११७३
कल्याण डोंबवली मनपा ९२९ ७७२६२ १०९६
उल्हासनगर मनपा ७० १२९९८ ३६५
भिवंडी निजामपूर मनपा ४४ ७४२२ ३४२
मीरा भाईंदर मनपा १८९ ३०९४९ ६७४
पालघर ११० १८१७४ ३२१
१० वसईविरार मनपा २१२ ३३४१७ ६३७
११ रायगड २३० ४०२८६ १००७
१२ पनवेल मनपा ३१६ ३६४१४ ६२७
ठाणे मंडळ एकूण ९१४७ ८१७२१२ १५ २०११६
१३ नाशिक ७६१ ४७४०० ८५५
१४ नाशिक मनपा ८५९ १०१२४४ ११२५
१५ मालेगाव मनपा ७३ ६५५२ १७२
१६ अहमदनगर ४०९ ५५८६९ ७६३
१७ अहमदनगर मनपा १८५ ३०२१७ ४२५
१८ धुळे १९७ ११२३७ १९१
१९ धुळे मनपा २१२ १११५४ १५०
२० जळगाव ७२५ ५७७०७ १२११
२१ जळगाव मनपा १९० २०९३४ ३५४
२२ नंदूरबार ४९८ १५४१८ २४६
नाशिक मंडळ एकूण ४१०९ ३५७७३२ १२ ५४९२
२३ पुणे १३६० ११३४१० २१९०
२४ पुणे मनपा ३५६६ २५१७०९ ४६७४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १८२८ १२२८४७ १३६१
२६ सोलापूर २४९ ४७०२८ १२४३
२७ सोलापूर मनपा २७१ १५९१९ ६३८
२८ सातारा २८८ ६२८६१ १८७७
पुणे मंडळ एकूण ७५६२ ६१३७७४ ११९८३
२९ कोल्हापूर ३५ ३५३५९ १२६१
३० कोल्हापूर मनपा २२ १५३७२ ४२५
३१ सांगली ८५ ३४२५४ ११७०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६९ १८७९५ ६३७
३३ सिंधुदुर्ग २८ ६९६३ १८४
३४ रत्नागिरी ३२ १२७१९ ४२८
कोल्हापूर मंडळ एकूण २७१ १२३४६२ ४१०५
३५ औरंगाबाद ५५२ २०८५४ ३५५
३६ औरंगाबाद मनपा ८९९ ५२८९६ ९७०
३७ जालना ४३२ २०५२२ ४०१
३८ हिंगोली १२९ ६२४४ १००
३९ परभणी १५१ ६१७० १७७
४० परभणी मनपा १३८ ५४६१ १४४
औरंगाबाद मंडळ एकूण २३०१ ११२१४७ २१४७
४१ लातूर २१६ २३८७५ ४८८
४२ लातूर मनपा १६९ ५८०४ २३९
४३ उस्मानाबाद १५३ १९६७८ ५८१
४४ बीड ३१२ २३५१० ५९३
४५ नांदेड ३७२ १३२८२ ४०४
४६ नांदेड मनपा ६५० २१७९० ३२१
लातूर मंडळ एकूण १८७२ १०७९३९ २६२६
४७ अकोला २७८ ९५९० १५२
४८ अकोला मनपा २७८ १६२२२ २६८
४९ अमरावती १३७ १५८७९ २७०
५० अमरावती मनपा ११३ ३०९२८ ३४८
५१ यवतमाळ ४७० २५९४३ ५२४
५२ बुलढाणा २६४ २५११० २७३
५३ वाशिम २२० १३७७६ १७५
अकोला मंडळ एकूण १७६० १३७४४८ २०१०
५४ नागपूर ७८२ ३१२६७ १० ८५४
५५ नागपूर मनपा २९६५ १७५७७९ १९ २८६४
५६ वर्धा ३६८ १९३८२ ३५९
५७ भंडारा २२० १५८८५ ३१७
५८ गोंदिया ४६ १५३८२ १७८
५९ चंद्रपूर २७९ १७१८६ २६०
६० चंद्रपूर मनपा १३४ १०४०४ १७३
६१ गडचिरोली ३९ ९७३६ १०६
नागपूर एकूण ४८३३ २९५०२१ ३५ ५१११
इतर राज्ये /देश १४६ ९४
एकूण ३१८५५ २५६४८८१ ९५ ५३६८४

आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू ठाणे-७, नाशिक-३, औरंगाबाद-२, पुणे-१, गोंदिया-१ आणि अकोला-१ असे आहेत.

 

Check Also

म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *