Breaking News

कोरोना: अबब बाधित ६३ हजारावर… तर आठवड्यात ४ लाखाची वाढ ६३ हजार २९४ नवे बाधित, ३४ हजार ८ बरे झाले तर ३४९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले./ सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात१.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली,

काल रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख एन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे असेही ते म्हणाले.

चार दिवसाच्या अंतराने राज्यातील रूग्णसंख्येचा विस्फोट झाला असून तब्बल ६३ हजार २९४ बाधितांची संख्या राज्यात आढळून आली आहे. साधारणत: राज्यात ७ व्या ते ८ व्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांची संख्या वाढली. मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण डोंबिवली, ठाणे शहर व ग्रामीण, नवी मुंबईत रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यानंतर नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरात मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या आढळून आली आहे.

तर मागील २४ तासाच ३४,००८ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत २७ लाख ८२ हजार १६१ जण बरे होवून घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.६५ एवढे झाले आहे. राज्यात ६३ हजार २९४  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या ५ लाख ६५ हजार ५८७  वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तर राज्यात आज ३४९  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी २१ लाख १४ हजार ३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ०७ हजार २४५ (१५.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३१ लाख ७५ हजार ५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार ६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९,९८६ ५,२०,४९८ ७९ १२,०२३
ठाणे १,०८७ ६१,६२४ १,०३६
ठाणे मनपा १,७८३ ९७,५३० १,३७५
नवी मुंबई मनपा १,३०६ ८४,८७६ १,२३७
कल्याण डोंबवली मनपा २,५५२ १,०१,८५७ १,१६०
उल्हासनगर मनपा २३२ १६,१७२ ३७७
भिवंडी निजामपूर मनपा ८९ ८,९०६ ३६६
मीरा भाईंदर मनपा ४५६ ३७,५२२ ७०७
पालघर ४४५ २२,४८९ ३२७
१० वसईविरार मनपा ६६६ ४०,५४१ ७९०
११ रायगड ७५५ ४७,०८५ १,०३९
१२ पनवेल मनपा ५९६ ४५,०७४ ६८९
ठाणे मंडळ एकूण १९,९५३ १०,८४,१७४ ९८ २१,१२६
१३ नाशिक १,७२४ ७१,८१५ १७ ९८५
१४ नाशिक मनपा १,६०८ १,४१,२०१ १,२६७
१५ मालेगाव मनपा ११ ७,४३६ १८९
१६ अहमदनगर १,७२२ ७५,६०३ ८३४
१७ अहमदनगर मनपा ५९८ ३८,९२८ ४५७
१८ धुळे २१९ १७,२५२ २१९
१९ धुळे मनपा ८९ १४,२०४ १७९
२० जळगाव १,२५८ ७३,४२८ १,२६१
२१ जळगाव मनपा ४३८ २५,४७२ ३८०
२२ नंदूरबार ४७९ २४,८१० ३४६
नाशिक मंडळ एकूण ८,१४६ ४,९०,१४९ ३८ ६,११७
२३ पुणे ३,२७६ १,४९,१६५ २,३०१
२४ पुणे मनपा ६,९२३ ३,३९,३५९ ४,८८७
२५ पिंपरी चिंचवड मनपा २,३९१ १,६३,०६२ १,४१८
२६ सोलापूर ८४६ ५५,९०८ १,३१८
२७ सोलापूर मनपा ३७४ २१,१७२ ७०७
२८ सातारा ८४३ ७३,११७ १,९३९
पुणे मंडळ एकूण १४,६५३ ८,०१,७८३ २८ १२,५७०
२९ कोल्हापूर १५४ ३६,८९५ १,२७२
३० कोल्हापूर मनपा ८१ १६,५४७ ४३५
३१ सांगली २७९ ३८,०७१ १,२००
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५० २०,५०० १६ ६८१
३३ सिंधुदुर्ग १९६ ८,३५० २०१
३४ रत्नागिरी १७६ १४,१४६ ४३६
कोल्हापूर मंडळ एकूण १,०३६ १,३४,५०९ २३ ४,२२५
३५ औरंगाबाद ४३९ २८,५०३ १६ ३९०
३६ औरंगाबाद मनपा ९६६ ७०,३४१ २० १,१०३
३७ जालना ६०५ २९,६२४ ५१२
३८ हिंगोली १०७ ८,७९२ १२३
३९ परभणी ४९६ १०,५६० २१७
४० परभणी मनपा ४०२ १०,२२४ १८८
औरंगाबाद मंडळ एकूण ३,०१५ १,५८,०४४ ५६ २,५३३
४१ लातूर १,११६ ३२,३७६ ५२५
४२ लातूर मनपा ४९० ११,७३२ २७९
४३ उस्मानाबाद ६८१ २५,७३१ ६३६
४४ बीड १,०९० ३३,०११ ११ ६८८
४५ नांदेड १,०६६ २५,०२८ ५३७
४६ नांदेड मनपा ५३८ ३३,६८१ ५२०
लातूर मंडळ एकूण ४,९८१ १,६१,५५९ ३३ ३,१८५
४७ अकोला ८६ ११,६७८ १७१
४८ अकोला मनपा २१३ २०,३७९ ३२७
४९ अमरावती १६३ १८,८७७ ३२१
५० अमरावती मनपा ११८ ३३,३६४ ३६५
५१ यवतमाळ २४३ ३१,३११ ५७७
५२ बुलढाणा ८८ ३६,६५० ३११
५३ वाशिम ४६५ १९,०६६ २०६
अकोला मंडळ एकूण १,३७६ १,७१,३२५ १२ २,२७८
५४ नागपूर २,४५७ ५४,९२७ १,०२६
५५ नागपूर मनपा ४,३३४ २,२९,३३१ २७ ३,२९२
५६ वर्धा ३८२ २६,०७२ ४००
५७ भंडारा १,४४९ २८,४७७ ३२९
५८ गोंदिया ७२७ २०,६६७ २०१
५९ चंद्रपूर ४५५ २२,०९५ ११ २९२
६० चंद्रपूर मनपा १६९ १२,५५७ १८५
६१ गडचिरोली १६१ ११,४३० १२१
नागपूर एकूण १०,१३४ ४,०५,५५६ ५९ ५,८४६
इतर राज्ये /देश १४६ १०७
एकूण ६३,२९४ ३४,०७,२४५ ३४९ ५७,९८७

आज नोंद झालेल्या एकूण ३४९ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६१ मृत्यू, नागपूर-१५,सांगली-१५, औरंगाबाद-८, अहमदनगर- ४, हिंगोली-३, जळगाव-३, परभणी- ३, बुलढाणा- २, नाशिक-२, जालना-१, नांदेड-१, उस्मानाबाद-१, रायगड-१, ठाणे-१ आणि वशिम-१ असे आहेत.

Check Also

तिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख

कोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *