Breaking News

कोरोना: कालच्या संख्येलाही टाकले मागे तर मुंबईत आजही ५ हजारापेक्षा अधिक ३५ हजार ९५२ नवे बाधित, २० हजार ४४४ बरे झाले तर १११ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील वर्षभरातील सर्वाधिक बाधितांची संख्या राज्यात आढळून आल्यानंतर आज पुन्हा कालच्या संख्येला मागे टाकत तब्बल ३५ हजार ९५२ नवे बाधित राज्यात आढळून आले. मुंबईत आजही ५ हजार ५०५ इतके रूग्ण तर मुंबई उपनगरातील प्रमुख असलेल्या ठाणे मध्ये १४२९ रूग्ण, कल्याण डोंबिवलीत १०२७, नवी मुंबईत ७५६ इतके नवे बाधित आढळून आले असून ठाणे मंडळातील मुंबईसह १२ महानगरपालिका आणि ग्रामीण भागात १० हजार ६२ इतके रूग्ण आढळून आले.

नाशिक शहर व ग्रामीण भागात ३ हजार ३८२, जळगांवात ८६२, अहमदनगरमध्ये १४००, पुणे जिल्हा व शहर मध्ये ५६८०, पिंपरी चिंचवड १७४७, औरंगाबादेत १९००, नागपूरात ३ हजार ६७० इतके नवे बाधित आढळून आले.

मागील २४ तासात २०,४४४ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख ८३ हजार ०३७ बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.७८ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ३५,९५२  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ६२ हजार ६८५ इतकी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८८ लाख ७८हजार ७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६ लाख ८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात १३ लाख ६२ हजार ८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५५०५ ३८०१४६ १३ ११६२३
ठाणे ४४९ ४८१४२ १०११
ठाणे मनपा ९८० ७२८९४ १२५४
नवी मुंबई मनपा ७५६ ६६७९८ ११७५
कल्याण डोंबवली मनपा १०२७ ७८२८९ १०९६
उल्हासनगर मनपा ११६ १३११४ ३६५
भिवंडी निजामपूर मनपा ६५ ७४८७ ३४२
मीरा भाईंदर मनपा २१० ३११५९ ६७५
पालघर १४० १८३१४ ३२१
१० वसईविरार मनपा १९२ ३३६०९ ६४४
११ रायगड २१४ ४०५०० १००७
१२ पनवेल मनपा ४०८ ३६८२२ ६२८
ठाणे मंडळ एकूण १००६२ ८२७२७४ २५ २०१४१
१३ नाशिक १०७८ ४८४७८ ८६०
१४ नाशिक मनपा २३०४ १०३५४८ ११२८
१५ मालेगाव मनपा ४१ ६५९३ १७४
१६ अहमदनगर ८५८ ५६७२७ ७६३
१७ अहमदनगर मनपा ४५५ ३०६७२ ४२५
१८ धुळे १९८ ११४३५ १९१
१९ धुळे मनपा १६६ ११३२० १५१
२० जळगाव ७३४ ५८४४१ १२१३
२१ जळगाव मनपा १२८ २१०६२ ३५४
२२ नंदूरबार ५३१ १५९४९ २४९
नाशिक मंडळ एकूण ६४९३ ३६४२२५ १६ ५५०८
२३ पुणे १३४० ११४७५० २१९४
२४ पुणे मनपा ३३४० २५५०४९ १६ ४६९०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७४७ १२४५९४ १३६१
२६ सोलापूर ३१५ ४७३४३ १२४४
२७ सोलापूर मनपा २८६ १६२०५ ६३८
२८ सातारा ३६३ ६३२२४ १८७७
पुणे मंडळ एकूण ७३९१ ६२११६५ २१ १२००४
२९ कोल्हापूर ५५ ३५४१४ १२६१
३० कोल्हापूर मनपा ३८ १५४१० ४२५
३१ सांगली ८९ ३४३४३ ११७०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५७ १८८५२ ६४०
३३ सिंधुदुर्ग ४७ ७०१० १८४
३४ रत्नागिरी २३ १२७४२ ४२८
कोल्हापूर मंडळ एकूण ३०९ १२३७७१ ४१०८
३५ औरंगाबाद ५२२ २१३७६ ३५५
३६ औरंगाबाद मनपा १३८० ५४२७६ ९७०
३७ जालना ३३७ २०८५९ ४०१
३८ हिंगोली ३३ ६२७७ १००
३९ परभणी ६१७९ १७७
४० परभणी मनपा ४०२ ५८६३ १४८
औरंगाबाद मंडळ एकूण २६८३ ११४८३० २१५१
४१ लातूर ३०५ २४१८० ४८९
४२ लातूर मनपा २१४ ६०१८ २४०
४३ उस्मानाबाद १७८ १९८५६ ५८१
४४ बीड ३४५ २३८५५ ५९७
४५ नांदेड ४५३ १३७३५ ४०४
४६ नांदेड मनपा ९५८ २२७४८ ३२२
लातूर मंडळ एकूण २४५३ ११०३९२ २६३३
४७ अकोला १४२ ९७३२ १५३
४८ अकोला मनपा ३२२ १६५४४ २७०
४९ अमरावती ९८ १५९७७ २७०
५० अमरावती मनपा १७८ ३११०६ ३४८
५१ यवतमाळ ३५२ २६२९५ ५२४
५२ बुलढाणा ६०२ २५७१२ २७७
५३ वाशिम ३११ १४०८७ १७८
अकोला मंडळ एकूण २००५ १३९४५३ १० २०२०
५४ नागपूर १०१४ ३२२८१ १० ८६४
५५ नागपूर मनपा २६५६ १७८४३५ १४ २८७८
५६ वर्धा ३०९ १९६९१ ३५९
५७ भंडारा २४१ १६१२६ ३१७
५८ गोंदिया ८६ १५४६८ १७८
५९ चंद्रपूर १०७ १७२९३ २६१
६० चंद्रपूर मनपा १०७ १०५११ १७३
६१ गडचिरोली ३६ ९७७२ १०६
नागपूर एकूण ४५५६ २९९५७७ २५ ५१३६
इतर राज्ये /देश १४६ ९४
एकूण ३५९५२ २६००८३३ १११ ५३७९५

आज नोंद झालेल्या एकूण १११ मृत्यूंपैकी ६६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू पुणे-९, पालघर-७ आणि ठाणे-१ असे आहेत.

 

Check Also

अ,ब,क वर्गातील शहर-जिल्ह्यांमध्ये कोविड उपचारासाठी हेच दर आकारता येणार अधिसूचनेस मंजूरी देत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *