Breaking News

कोरोना: बरे होणाऱ्याच्या प्रमाणात घट तर २ ऱ्या दिवशीही १५ हजारापार बाधित १५ हजार ६०२ नवे बाधित, ७ हजार ४६७ बरे झाले तर ८८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर दुसऱ्याबाजूला बाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के होते. त्यात आता २ टक्क्याने घट झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी १५ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत काल १६०० तर आज १७०० रूग्ण बाधित आढळून आले आहेत. त्याचबरोबर ठाणेमध्ये ४०० हून अधिक, कल्याण डोंबिवलीत ४१९ बाधित आढळून असून ठाणे मंडळातील एकूण ३ हजार १९८ बाधितांची आज नोंद झाली. नाशिक मंडळात २ हजार ६४७, पुणे मंडळातही ३३६५, नागपूरात २ हजार ६९० इतके बाधितांची नोंद झाली.

मागील २४ तासात ७,४६७ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख २५ हजार २११  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४९% एवढे झाले आहे. दिवसभरात राज्यात १५,६०२  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १८ हजार ५२५ इतकी झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,०३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १७०९ ३४१९९९ ११५२८
ठाणे १०८ ४४४६७ १००५
ठाणे मनपा ३३८ ६५८१३ १२५४
नवी मुंबई मनपा १९६ ६१९६७ ११५७
कल्याण डोंबवली मनपा ४१९ ७०६२२ १०८५
उल्हासनगर मनपा ३४ १२२०६ ३५६
भिवंडी निजामपूर मनपा १४ ७०८४ ३४२
मीरा भाईंदर मनपा ६५ २९५४५ ६७०
पालघर ४१ १७५२४ ३२१
१० वसईविरार मनपा ४६ ३२२५० ६१८
११ रायगड ७८ ३८९०७ ९९७
१२ पनवेल मनपा १५० ३३८०० ६१६
ठाणे मंडळ एकूण ३१९८ ७५६१८४ १७ १९९४९
१३ नाशिक ३४८ ४१२४७ ८२९
१४ नाशिक मनपा ६६० ८९६४९ १०९३
१५ मालेगाव मनपा ८४ ५७०९ १६८
१६ अहमदनगर ३४१ ५१३६६ ७४९
१७ अहमदनगर मनपा ९९ २८०७८ ४२२
१८ धुळे ७६ ९५१८ १८७
१९ धुळे मनपा १२० ९११० १५०
२० जळगाव ४३२ ५०९२१ ११९६
२१ जळगाव मनपा २८० १८०९९ ३४६
२२ नंदूरबार २०७ ११२७८ २२९
नाशिक मंडळ एकूण २६४७ ३१४९७५ १२ ५३६९
२३ पुणे ६२६ १०३६४७ २१६८
२४ पुणे मनपा १६६७ २२३३२४ १० ४६२२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७७३ १०९३३२ १३४३
२६ सोलापूर १११ ४५१९० १२२९
२७ सोलापूर मनपा ७४ १४३६४ ६२६
२८ सातारा ११४ ६०५७२ १८५७
पुणे मंडळ एकूण ३३६५ ५५६४२९ १३ ११८४५
२९ कोल्हापूर १८ ३५०२१ १२६०
३० कोल्हापूर मनपा २४ १५०८९ ४२४
३१ सांगली ३० ३३४५७ ११६४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३ १८३३१ ६३४
३३ सिंधुदुर्ग ६७५९ १८०
३४ रत्नागिरी २० १२३२३ ४२५
कोल्हापूर मंडळ एकूण १२१ १२०९८० ४०८७
३५ औरंगाबाद १८० १६८७४ ३४०
३६ औरंगाबाद मनपा ५९१ ४१६५२ ९४७
३७ जालना १७४ १६४७३ ३९४
३८ हिंगोली ६१ ५२८० १००
३९ परभणी ३१ ४९८८ १७२
४० परभणी मनपा २३ ४२६० १४१
औरंगाबाद मंडळ एकूण १०६० ८९५२७ २०९४
४१ लातूर ४७ २२५५९ ४८१
४२ लातूर मनपा ६१ ४२६० २३५
४३ उस्मानाबाद ३७ १८४७८ ५७६
४४ बीड १८३ २०५३६ ५७६
४५ नांदेड १०७ ९९२१ ३९३
४६ नांदेड मनपा ३०३ १५७५८ २९८
लातूर मंडळ एकूण ७३८ ९१५१२ २५५९
४७ अकोला १३८ ७६४८ १४७
४८ अकोला मनपा २४० १२३६७ २५७
४९ अमरावती २०२ १४०५९ २४०
५० अमरावती मनपा २२५ २८८८४ ३२५
५१ यवतमाळ २८३ २१७२९ ४९७
५२ बुलढाणा ५३५ २०५३१ २७०
५३ वाशिम १६० ११२२० १६९
अकोला मंडळ एकूण १७८३ ११६४३८ १२ १९०५
५४ नागपूर ४५१ २३२८२ ८१२
५५ नागपूर मनपा १८२८ १४७९१२ ११ २७६७
५६ वर्धा २३५ १५८६३ ३१९
५७ भंडारा ६६ १४५३४ ३१५
५८ गोंदिया १५ १४८१७ १७५
५९ चंद्रपूर ४१ १६१२७ २५५
६० चंद्रपूर मनपा ३० ९७६४ १६६
६१ गडचिरोली २४ ९३०३ १०३
नागपूर एकूण २६९० २५१६०२ १९ ४९१२
इतर राज्ये /देश १४६ ९१
एकूण १५६०२ २२९७७९३ ८८ ५२८११

आज नोंद झालेल्या एकूण ८८ मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७ मृत्यू पुणे-८, नागपूर-८, रायगड-४, परभणी-२, रत्नागिरी-२, ठाणे-२ आणि वर्धा-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *