Breaking News

लाईट बंद … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची ग्रामीण परिस्थितीवरील कथा

रम्या गावातला झोलर माणूस. याचे पैसे त्याचाकडून, त्याचे पैसे याच्याकडून आणि जिकडून पैसे काढता येतील तिकडून काढायचा पक्का धंदेवाईक माणूस. त्याची गुजरातची नोकरी सुटल्यावर सरळ गावाला येऊन त्याने किराणा मालाच दुकान टाकलं होतं. नेरेंद्र्भाई त्याच्यासाठी देव माणूस जणू काही याचा जन्म नरेंद्रभाईच्या जांगेतूनच झाला असावा. रम्याने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी गावापासून लांब पण तालुक्याच्या जवळ घर बांधलेलं. तस तो पंचक्रोशीत झोलर आणि नरेंद्राची उजवी गोटी म्हणूनच प्रसिद्ध होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीत नेरेंद्र्भाई दिसायचा. ज्या वाहिनीवर नेरेंद्र्भाई दिसणार नाहीत अश्या वाहिन्या त्याने बंद केल्या. त्याची हि पाचवी टीव्ही ज्या दिवशी नेरेंद्र्भाई  टीव्हीवर दिसणार नाही त्यादिवशी त्या टीव्हीची मौत पक्की. ज्या दिवसापासनं कोरोना गावापर्यंत पोचला, त्या दिवसापासून तो नेरेंद्र्भाईला न सांगण्या पलीकडे काळजाच्या वेगळ्या कक्षेत बंदिस्त करून ठेवलं. त्याचा बाकी कोणावरच विश्वास नाही. कोरोनाला संपवणार तर नेरेंद्र्भाईच. त्याला  खात्री होती नेरेंद्र्भाई आपल्या आयुष्यात आहेत, तोपर्यंत कोरोना आपलं झाट काही वाकड करू शकत नाही. त्याच्या घरापासून त्याचं गाव खूप आतमध्ये होतं. काही सुखसोई नसल्यामुळे त्याने तालुक्याजवळ घर बांधल होत. पण फुशारक्या मारत दिवसभर गावभर तालुकाभर फिरायचा कार्फ्यु हा त्याच्यासाठी नव्हताच जणू .

नेरेंद्र्भाई काही टीव्हीवरून संदेश दिला कि कुत्र्यावणी धावत येऊन तो संदेश गावात जाऊन  पोहोचवायचा त्याला अस वाटायचं कि हा संदेश फक्त देशभरात मी एकटाच ऐकत आहे. गावात लाईट नसल्यामुळे साहजिकच कोणाकडे टीव्ही नव्हती त्यामुळे रम्या कोणताही संदेश तितक्याच वेगवान गतीन पोहोचवायचा. रम्या जेवायला बसला होता आणि त्याला अचानक आठवल नेरेंद्र्भाईनी सांगितलाय ताट वाजवायला कारण ताट वाजवल्याने कोरोना मरणार रम्या तसाच अर्ध्या जेवणावरून उठाला, उरलेलं जेवण तसंच फेकून दारात ताट वाजऊ लागला. त्याच्या  चटकन लक्षात आलं आपल्याला आपल गाव वाचवलं पाहिजे. त्याने गाडीला रिकामा पत्र्याचा तेलाचा डब्बा बांधला आणि तसाच तडक गावात आला. हा कसला आवाज म्हणून लोक घाबरून झोपलेलेल बाहेर येऊन उभे. हा रम्या आता त्याला हिरो असल्यासारख वाटलं सगळेच त्याच्याकडे पाहू लागले नेरेंद्र्भाईचा गंडा काढून डोळ्याला दोनदा चिपकवला चुम्मा घेतला आणि सांगू लागला.” ह्या बघा नेरेंद्र्भाईनी सांगितलाय कोरोनाला मारायचा असाल तर रिकामी भांडी ताट वाट्या वाजवा आणि हा जो  काय कोरोना का फोरोना आलाय त्याला मारून टाका”. जनी म्हातारी कंदील फूड करीत आली “आर रांडच्या माझं लग्न करून ह्या गावात आला तवापासनं नशिबात फुटकी भांडीच वाजवतंय आन बाकीच्या सासरावास्नी पन त्याच करयला लावत”. तुझ्या त्या नेरेंद्र्भाईच्या गोट्यांना वाट्या बांध आन बस वाजवत. “ सगळे हसून हसून पुन्हा झोपायला गेले जाता जाता सुरेस बोलला. “अरे ये अडान झवन्या हितं माजुऱ्या नाय हायत मुंबईतना चालत  निघालेलं आमचं गडी अजून पोचलेलं नाय, खायाला काय नाय न कोनाच्या नावान ताट वाट्या वाजवायच्या र”. सुरेस जाता जाता स्वताशीच पुटपुटतो “ अडान झवनं नी  फोद्य्चा सत्त्यानास ”. अपमान हा आपला प्रसाद मानून पुन्हा आपल्या घराच्या दिशेने  डब्बा गाडीला घासत निघून गेला.

रम्याला झोप लागेना देशावरचं संकट दोनच माणसं घालऊ शकतात एक म्हणजे नेरेंद्र्भाई आणि दुसरा मी. जस जसे पेशंट वाढत होते तसतसा रम्या आता तासनतास टीव्हीसमोर बसू लागला. त्याची तब्बेत थोडी खालाऊ लागली तो वाट पाहू लागला नेरेंद्र्भाईच्या नव्या उपचाराची आणि अश्यावेळी एकदाचे आले नेरेंद्र्भाई आणि सांगितलं कि “पाच तारखेला रात्री नऊ वाजता नऊ मिनिट लाईट बंद ठेऊन दिवे पेटवा त्या दिव्याच्या गरमीने कोरोनाचा नायनाट होणार”. झालं रम्या जगावर आलेलं संकट हि पेलायची जबाबदारी आपल्यावरच टाकली आहे हे स्वतःच मानून  तडक गावाकडे निघाला. मुंबईतन चार पाच दिवसाचा पायी प्रवास करून आलेले चाकरमनी कोवळ्या उन्हात आपल शरीर शेकवत होते. दिवसाची सुरुवात करणारच होते. इतक्यात रम्या आपल्या  नेहमीच्या जागेवर गेला सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. आणि बोलू लागला, “ पाच तारखेला नव वाजता नव मिनिट सगल्यांनी लायाटा बंद ठेऊन दिवं  पेटवा. कोरोना त्या गरमीन मरून जायल असा संगीतालीन हाय नेरेंद्र्भाईनी आणि भाई बोललेत म्हणजे कायतरी विचार करून बोलले असतील, त्यामूलं लायटा घालवा आणि कोरोनाला मारा”. इतक्यात मुंबई ते गाव असा पायी प्रवास केलेला प्रकाश त्याच्या जवळ गेला, त्याला खाली बसवत म्हणाला “ ये बाला ये बस. मला एक सांग तू येडझवा आहेस कि आम्ही येडझवे वाटलो. अरे इतकी वर्ष झाली गावात लाईट हाय कायरे. लोकांकडे खायला काय नाय, पैसा नाय रेशन अजून नाय भेटलाय, आम्ही आमची गांड फाडून हितपर्यंत चालत आलाव. गावात लाईट नाय  माहित हाय ना एवढा कसा रे येड्याभक्ताचा तू”.

रम्याची आत्ता टूब पेटली “होय झो गावात लाईटच नाय”. पुन्हा जनी म्हातारी हातात इला घेऊन आली आणि म्हणाली परत हित दिसलास ना, तर तुझ पण शेमनं कापीन न त्या तुझ्या त्या नेरेंद्र्भाईचं उगाच सकालच्याराम्पार्यात आमची तोंडा वाजवायला येऊ नको” . रम्याला कळलं  वातावरण गंभीर  होत चाललय त्याने हळूच पाय काढता घेतला . रस्त्याने त्याच्या डोक्यात एकच विचार “गाववाल्यांना एवढा माज आलाय गाववाल्यांना नेरेंद्र्भाई कोण आहेत, अरे यार त्यांचा अपमान? नाही… नाही… त्याला बैचेन वाटू लागल. घरी गेल्यावर झालेला अपमान  आपल्या गळ्यातल्या नेरेंद्र्भाईचा  फोटो गोमुत्राने शुद्ध करून घेतला. आणि एकामागोमाग एक शिंका देऊ लागला . काही दिवस चर्चा सुरु राहिली रम्या गावात येईनासा झाला तर कळालं  कि रम्याला कोरोना झालाय. आता गाव मात्र सावध झालं. जनी म्हातारीला आपल्या पोराची आता काळजी वाटू लागली पोराला न बघताच आपल्याला हा रोग झाला तर…  दिवसेंदिवस भयानक गोष्टी तिच्या कानावर येत होत्या. काही खऱ्या आणि जास्त खोट्या जगात खूप माणसं मारताहेत एवढंच तिला माहिती. तेल संपू नये म्हणून  कंदील घालवला आणि झोपी गेली. अंधारात अजून किती पोरांच्या प्रेतांसमोर दिवे लावावे लागणार याची गोळाबेरीज करत.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *