Breaking News

कोरोना रूग्णसंख्येतील वाढ चिंता वाढवणारी आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करावेत-वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई : प्रतिनिधी

सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी शक्यता आणि भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरावी किवा तीची तीव्रता कमी रहावी यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी सजग राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात शिवाय नागरीकांनीही यासंबंधाने असलेल्या सर्व मार्गदर्शनपर सुचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले.

मागच्या काही दिवसात भारतातील एकूण कोविड १९ बाधित रूग्णसंख्सेत वाढ झाल्याचे दिसून आले असून यात केरळ सारख्या राज्यातील वाढ लक्षणीय आहे. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हळूहळू कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आगामी काही दिवसात ही रूग्णसंख्या अधिक गतीने वाढून ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली. या सर्व तज्ञांचा हा इशारा लक्षात घेता लातूर जिल्हयातील आणि संपूर्ण राज्यातीलच प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जनतेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या संदर्भाने लागू असलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गर्दीत जाणे / प्रवास करणे टाळावे

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याळनंतर लॉकडाऊन नियमात शिथीलता आणल्यामुळे बहुतांशी औदयोगिक, व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजार सुरू झाले आहेत, असे असले तरी संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यासर्व ठिकाणी कोविड१९ मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. कोणत्याच ठिकाणी गदी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. या संदर्भाने प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शारिरीक आंतर पाळणे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या बाबतीत जनतेने विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, शक्यतो गर्दीतील संपर्क टाळावा, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले घरीच राहतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

 प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू ठेवाव्यात 

रूग्ण संख्येत होणारी वाढ आणि तज्ञांचा इशारा लक्षात घेऊन लातूर जिल्हयासह प्रशासन, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका इतर संस्था आणि आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून कोणत्याही ठिकाणी कोणत्याच परिस्थितीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेतानाच अशा सार्वजनिक ठिकाणी शारिरीक आंतर पाळले जाईल, मास्क सॅनिटायझर वापर होईल याचे नियोजन करावे. त्याच बरोबर सर्व प्रकारच्या इतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू कराव्यात, उपचाराच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे निर्देशही संबंधितांना त्यांनी दिले.

गंभीरातील गंभीर परिस्थिती उदभवली तरी सर्वांना वेळेत चांगले उपचार मिळतील यासाठी जिल्हा रूग्णालये, ग्रामिण रूग्णालये व इतर रूग्णालयाच्या ठिकाणी वाढीव बेड, औषधे, उपकरणे उपलब्ध करून ठेवावीत, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर याची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करावे. प्रगतिपथावर असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत असे निर्देशही त्यांनी दिले.

वैदयकीय महाविदयालयावर महत्वपूर्ण जबाबादारी 

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातील वैदयकीय महाविदयालयांनी रूग्ण सेवेत महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता रूग्णांच्या उपचारासाठी महाविदयालयाशी संलग्नित रूग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्या रूग्णालयांना आणखी काही सुविधा मनुष्यबळ हवे असल्यास त्या संबंधी अधिष्ठातांनी तातडीने मागणी नोंदवावी त्याची पूर्तता तात्काळ केली जाईल. गंभीर अवस्थेतील रूग्णांसाठी वैदयकीय महाविदयालय संलग्नित रूग्णालयात विशेष उपचार यंत्रणा उभाराव्यात, लवकरात लवकर रूग्णांची तपासणी होईल यादृष्टीने प्रयोगशाळेची क्षमता वाढवून घ्यावी, बेडची संख्या वाढवावी सर्व बेड ऑक्सिजनेटेड असावेत यादृष्टीने काळजी घ्यावी. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका सांगितला असल्यामुळे यासाठी स्वतंत्र आणि सर्व आवश्यक सुविधसह उपचार कक्ष उभारले जावेत असे आदेशही त्यांनी दिले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *