Breaking News

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन हमी, भत्ते, आरोग्य सेवा, पीएफ कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करण्याचे कामगारमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी
ज्या शासकीय विभागात आणि कार्यालयात कंत्राटदारांमार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत अशा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसांनुसार महिन्याकाठी कंत्राटदाराने संबंधित कर्मचाऱ्याचे करारानुसार वेतन व भत्ते, मूळ वेतन, विशेष/ महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी (P.F.), राज्य कामगार विमा योजना (E.S.I.S)/कर्मचारी नुकसान भरपाई (W.C.), व्यावसायिक कर (P.T.), बोनस व सुट्टयांच्या दिवशी केलेले काम इ. अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे, असे निर्देश संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना भविष्यकाळात कामगार असण्याचे सर्व भत्ते आणि सोयी सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान कार्यपध्दती लागू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक होते. या संदर्भात उद्योग, उर्जा व कामगार विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करताना समान कार्यपध्दती अवलंबविण्याचे आदेश त्यांनी दिले.
प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेऊन विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय विभागाने शक्य असेल तेथे संबंधित कामे बाह्य यंत्रणेकडुन करुन घेण्याबाबतचे धोरण राज्य शासनाने अंगिकारले आहे. सदर धोरणानुसार शासनाच्या विविध, विभागाअंतर्गतच्या कार्यालयांमार्फत कंत्राटदारांकडून कंत्राटी स्वरुपात मनुष्यबळ घेण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी हे शासनास सेवा देण्यास कायम कटिबद्ध असतात.
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजना, कर्मचारी नुकसान भरपाई, व्यावसायिक कर, कामगार कल्याण निधी इत्यादी वैधानिक देणी/वजावटी कापुन घेऊन संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वैधानिक देणी जमा करण्याच्या खात्यांमध्ये जमा कराव्यात. तद्नंतर, कंत्राटदाराने एकूण प्रदान केलेले वेतन, सेवाशुल्क व अन्य करांसह एकत्रित व प्रदान करण्यात आलेल्या वेतनाच्या पुराव्यांसह देयक संबंधित कार्यालयास सादर करावे. कंत्राटदारामार्फत परिपत्रकातील नमूद यादीप्रमाणे सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे,पुरावे तपासुन सदर शासकीय विभागामार्फत संबंधित कंत्राटदारास रक्कम आदा करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
या परिपत्रकान्वये शासकीय विभागामार्फत मनुष्यबळ पुरवठ्यासाठीची निविदा काढताना, या निविदा मसुद्यामध्ये वेतन आदा करण्यासंबंधीच्या समान तरतुदींचा समावेश करण्यासाठीचा मसुदा देखील उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत निर्गमित केला आहे. सदर शासन परिपत्रकामुळे राज्य शासनाच्या ‍विविध प्रशासकीय विभाग, कार्यालयांमध्ये कंत्राटदारांमार्फत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना करारानुसार व विविध कामगार कायद्यांनुसार वेतन प्राप्तीची हमी मिळणार आहे.

Check Also

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील प्रचार थंडावला

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजून जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात …

2 comments

  1. Shaikh Ayesha kasam

    आरोग्य सेवेतील केंंद्र सरकार ने घेतलेले कंत्राटी आरोग्य कर्मचारीयाना समान काम समान वेतन देने , कामाच्या तुलनेत त्यानांं खुप कमी मानधन आहे .कोणी तरी या बाबतीत लक्ष घालावे .ही विनंती

  2. Shahaji nalawade

    या सरकार ने ..कंञाटी कर्मचारी बद्दल पाहीजे असा कुठलाच निर्णय घेतला नाही..
    कंञाटी कर्मचारी कायम कर्मचारी पैक्षा जास्त काम करुन तो सतत दबावात असतो..
    कुठलीही शाशनाची योजना १००% पुर्ण करायला कंञाटी कमचारीचं असतो..
    शासनाने कंञाटी कर्मचारी चा विचार करावा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *