Breaking News

बांधकामासाठीचे साहित्य महागणार गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात जुलैपासून दीडपट वाढीचा- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी

इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या चुना, चुनखडी, दगड, बारीक खजी, मुरूम, कंकर, माती, विटांसाठीची माती, ग्रेनाईट वगळता इतर खनिजाच्या प्रतिब्रास दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आगामी काळात इमारतीच्या बांधकाम साहित्य आणि खर्चात वाढ होवून त्याचा परिणाम सदनिकांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे.

राज्य सरकारने घेतलेला निर्णय खालील प्रमाणे-

गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या व डेड रेंट दरात दीडपट वाढ करण्याच्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे वाढीव दर १ जुलै २०२१ पासून लागू होतील.  गौण खनिजाच्या स्वामित्वधनाचे दर खालील प्रमाणे असतील.

  1. बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्टयांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेला चुना रुपये ६००/- प्रति ब्रास.
  2. उत्खननाद्वारे किंवा गोळा करुन काढलेले सर्व दगड मग त्याचा आकार केवढाही असो आणि दगडाची भूकटी रुपये ६००/- प्रति ब्रास.
  3. बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगड (लॅटराईट स्टोन) रुपये १५०/- प्रति ब्रास.
  4. (क) उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरूम, कंकर रु. ६००/- प्रति ब्रास.

(ख) केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरीता वापरण्यात येणार चॅल्सेडोनी खडे रु. ३०००/- प्रति ब्रास.

(ग) पुढील प्रयोजनाकरिता वापरण्यात न येणारी सर्वसामान्य वाळू.

सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे, धातुशास्त्रीय, दृष्टिविषयक, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी, मातीची भांडी व काच सामान तयार करण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता रुपये १२००/- प्रति ब्रास आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता रुपये ६००/- प्रति ब्रास.

  1. कौले (मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकणमाती रुपये ६००/- प्रति ब्रास.
  2. अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग व इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती रुपये ६००/- प्रति ब्रास.
  3. बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते, त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक रुपये ६००/- प्रति ब्रास.

8.विटा तयार करण्याच्या व इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी साधी माती, गाळ व सर्व प्रकारची चिकणमाती, इत्यादी रुपये २४०/- प्रति ब्रास.

  1. फुलरची माती किंवा बेटोनाईटरुपये १५००/- प्रति ब्रास.
  2. सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्व प्रकारचे दगड (ग्रॅनाईट वगळून) रुपये ३०००/- प्रति ब्रास
  3. इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाईट वगळूनव केंद्र शासनाने दिनांक १०/०२/२०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) रुपये ६००/- प्रति ब्रास.

सर्व गौण खनिजे (ग्रॅनाईट वगळून व केंद्र शासनाने दिनांक १०/०२/२०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून)  रु. ९,००० प्रति हेक्टर किंवा त्याच्या भागासाठी ठोकबंद भाडे आकारण्यात येईल.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *