Breaking News

काँग्रेसमधला नेतृत्व गोंधळ संपला : सोनिया गांधीच, अन्यथा राहुल गांधी अध्यक्ष पदी सोनिया गांधीच राहणार असल्याचा ठराव संमत करून बैठक संपली

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी

पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे ठेवायचे कि त्यांच्या ठिकाणी नवा अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला काँग्रेसमधील गोंधळ संपुष्टात आला. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अर्थात अध्यक्ष पद सोनिया गांधी यांच्याकडे कायम ठेवण्याचा ठराव पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्यावतीने एका प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली. याविषयीचा ठराव पक्षाचे सरचिटणीस मल्लिकार्जून यांनी मांडला.

पक्षासाठी सोनिया गांधी यांनी मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे. तसेच त्यांच्याच कार्यकाळातच पक्ष सत्तेवर आला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेकवेळा विजय मिळविला आहे. त्यामुळे त्यांचेच पक्षाच्या अध्यक्ष पदावर राहणे योग्य असून त्या स्वत:हून या जबाबदारीतून मुक्त होणार नाहीत. तो पर्यत अध्यक्ष पद त्यांच्याकडे राहणार आहे. तसेच ज्या दिवशी त्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त होतील त्यादिवशी त्या पदी राहुल गांधी यांची निवड करावी अशा पध्दतीचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने करत तो काँग्रेस कमिटीला पाठविला आहे. याविषयीचा ठराव प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडला तर त्यास अनुमोदन अशोक चव्हाण यांनी दिले.

पक्षातील १०० हून अधिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न उपस्थित करत पक्षाला नव्या अध्यक्षाची गरज असल्याची बाब सोनिया गांधी यांनाच पत्र लिहून त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे अखेर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कार्यकारी अध्यक्ष पद सोडण्याची तयारी करत तसे पत्र पक्षाच्या कार्यकारणीला लिहिले. याशिवाय पक्षाला नवा अध्यक्ष निवडण्याचे आदेशही दिले होते.

Check Also

अल्पसंख्याक विभागाकडून विद्यार्थ्यांना आहाराकरीता मिळणार रोख रक्कम मासिक ३ ते साडेतीन हजार रुपये रक्कम मिळणार-मंत्री नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *