Breaking News

मराठी ई-बातम्याने भाकित केलेल्या मंत्र्यांसह ३६ जणांचा शपथविधी उपमुख्य़मंत्री पदी अजित पवार, शिवसेनेचे आदीत्य ठाकरे झाले मंत्री

मुंबईः प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ६, काँग्रेसच्या ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ मंत्र्यांची नावे भाकित केली होती. यापैकी बहुतांष आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतल्याने मराठी ई-बातम्या.कॉमचे वृत्त खरे ठरले. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. तर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आलेले आदीत्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.
संभावित राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आदी मंत्र्याची नावे भाकित केली होती. या सर्वच आमदारांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, आदीती तटकरे, धनंजय मुंडे, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख आदी जणांची संभावित मंत्री पदी नियुक्ती केली जावू शकते  २३ डिसेंबर २०१९ रोजीच्या वृत्तामध्ये भाकित केले होते. त्यानुसार या सर्वांनीच आज मंत्री पदाची शपथ घेतली.
शिवसेनेतून यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते, रामदास कदम, रविंद्र वायकर यांचा समावेश होणार नसल्याचे भाकित केले होते. त्यानुसार या तिघांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. मात्र दादाजी भुसे, शंभूराजे देसाई या दोन जणांची नावे संभावित मंत्री म्हणून २७ डिसेंबर २०१९ रोजीच्या वृत्तांमध्ये करण्यात आली होती. संकेतस्थळाने भाकित केल्याप्रमाणे या दोन्ही आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *