Breaking News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव अवमान याचिकेप्रकरणी मजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

मुंबईः प्रतिनिधी
भाजपाच्या नेत्याने दाखल केलेल्या अवमान याचिकेप्रकरणी सुणावनीसाठी राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा निर्णय गिरगांव मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दिल्याने सदरच्या निर्णयाच्या विरोधात आणि दाखल करण्यात करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
भाजपा सदस्य महेश हुकुमचंद श्रीश्रीमल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गिरगांव मॅजिस्ट्रेट न्यायालयात अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली. या याचिकेच्या अनुषंगाने फौजदारी स्वरूपाची कारवाई न्यायालयाने २८ ऑगस्ट २०१९ रोजी सुरु केली. या अनुषंगाने कोर्टाने त्यांना १२ जुलै २०२१ मध्ये त्यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रकरणी आपले म्हणणे सादर करताना आपल्या विरोधात गुन्हा नोंदविला असल्याची माहितीच नसल्याचे स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये एका काँग्रेसच्या रॅलीत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्या वक्तव्यामुळे मोदींना प्रसारमाध्यमासह अनेक प्लॅटफोर्मवर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर चार दिवसानंतर राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर “The sad truth about india’s commander in theif ” मत प्रसिध्द केले. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाणीवपूर्वक commander in theif असा उल्लेख करत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांसह देशातील सर्व नागरीकांशी जोडले. त्या विरोधात श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात याचिका दाखल केली.
यासंदर्भात राहुल गांधी यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकत हा निव्वळ राजकिय उद्देशातून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मत व्यक्त करण्यात आल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील कुशल मोर यांनी सांगितले.
तसेच या खटल्याच्या पुढील सुणावनीवर स्थगिती द्यावी आणि सदरचा गुन्हा रद्द करावा अशी मागणीही त्यांनी याद्वारे केल्याचे सांगितले.
या सुणावनीस गांधी यांचे कौन्सल अॅड.सुदीप पासबोला हे इतर न्यायालयातील सुणावनीमुळे हजर राहु शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुणावनी २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

Check Also

एनसीबी म्हणते, एसआयटी तपास करणार पण कोणाकडून केसेस काढल्या नाहीत ट्विट करत परिपत्रक जारी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे साऊथ वेस्ट झोनलचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी आर्यन खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *