Breaking News

भाजपप्रणित राज्यातच “मोदी मॉडेल”चा फज्जा ! काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल ना केवळ खुद्द स्थानिक प्रसार माध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले, पण सन्मा. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोलही सुनावले. यामुळे, गुजरातचे “अकार्यक्षम मॉडेल”च आता देशापुढे उघड़ झाले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय पॅनल प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली.

उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामूदायिकरित्या शेकडो प्रेतांना अग्नि दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य सोशल मीडियावर वायरल झाली. उत्तर प्रदेश हे आता “नाथांचे नसून अनाथांचे राज्य” बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी उपरोधिकपणे म्हंटले. गोव्यामधे ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. “मुख्यमंत्र्यांवर राणेंची (विश्वजीत) आगपाखड़” हे महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यात भाजपमधील दररोजचे चित्र आहे असा टोमणाही गाडगीळ यांनी लगावला. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बेंगलुरु शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या “कोरोना-मृतांसाठी राखीव” ठेवाव्या लागल्या आहेत.

सारांश, गेल्या महिन्याभरातील वरील राज्यांअंतर्गत परिस्थितीच्या सर्वेक्षणानंतर भाजपची सरकारे असलेल्या राज्यातच “मोदी मॉडेलचा फज्जा” उडाला असल्याची टीका गाडगीळ यांनी केली.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *