Breaking News

कमला मिल आगप्रकरणी काँग्रेस भाजपकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काँग्रेसच्या निरूपम यांच्या आरोपाला भाजपच्या भांडारींचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परळमधील कमला मिल कंपाऊडमधील मोजो ब्रिस्टो आगप्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी हॉटेल मालकांसोबत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. त्यास प्रतित्तुर देत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी काँग्रेस काळातील नियमबाह्य परवाग्यांचे पितळ उघड होवू नये यासाठीच प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा दावा केल्याने कमला मिल आगप्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच राजिकय सामना रंगला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मोजो ब्रिस्टो या रेस्टॉरंटवर करण्यात येणारी कारवाई रोखण्यासाठी मंत्री दर्जाच्या नेताचा फोन करून दबाव आल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर यावरून खळबळ उडाली. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांनी विशेषत: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई आयुक्त मेहता यांनी त्या संबधित नेत्याचे नाव जाहीर करण्याचे आवाहन करत राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी यावर कडी करत मोजोच्या मालकासोबतच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याचा आरोप करत हे या रेस्टॉरंटचे मालक हे सगळे नागपूरचे असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर यातील एका भागीदाराचे वडील हे हवाला दलाल असून त्यांचे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबध असल्यानेच त्यांना वाचविण्यासाठी

मालकांच्या अटकेबाबत चालढकल करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

कमला मिल प्रकरणी वेगाने तपास सुरु असून या प्रकरणातील आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्यांपर्यंत लवकरच पोहचणार आहेत. या तपासात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील मिल ते मॉल रूपांतरातील भ्रष्टाचार या आगीच्या निमित्ताने बाहेर पडण्याची शक्यता दिसू लागल्याने तपास यंत्रणांवर दबाव आणण्यासाठीच या पध्दतीचे आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचा प्रतिआरोप करत काँग्रेसवरच हा आरोप उलटविण्याचा प्रयत्न भाजपच्या माधव भांडारी यांच्याकडून करण्याचा आला.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *