Breaking News

कॉंग्रेसने त्यांच्या १२ पराभूत जागा द्याव्या आम्ही निवडून आणू भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आम्ही कुठलीही आघाडी केली नाही. मात्र भाजप-सेनेला पराभूत करण्यासाठी मी काँग्रेसला आघाडी करण्यासाठी एकत्र बसू असे सांगितले होते. मात्र तेच आले नाहीत. त्यामुळे आम्ही एमआयएमने दिलेला हात स्विकारला. तसेच २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस पक्ष ज्या २२ जागांवर पराभूत होत होता. त्यापैकी त्या १२ जागा आम्हाला द्या असा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला. तसेच कोणत्या १२ जागा द्यायच्या हे देखील त्यांनीच ठरवून द्यावे असे काँग्रेसला कळविले. त्यावर त्यांच्या नेत्यांनी चर्चा करून कळवतो असे सांगून अजूनही नुसता फोन देखील केला नसल्याची माहिती भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आज प्रकाश आंबेडकर यांनी भारिपच्या मुंबई कार्यालयात पत्रकार परिषद घेत आम्ही महाआघाडीसाठी तयार असल्याचे देखील सांगितले.
शरद पवार यांनी राहुल गांधींना खोटे पाडले-
राफेल प्रकरणावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोटे पाडले. त्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सोबत जायचं की जाऊ नये याचा विचार काँग्रेसच्या नेत्यांनी करावा असे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच आम्ही एमआयएम सोबत गेलो त्यावरून काँग्रेस आता सल्ले देऊ लागलीय. मात्र काँग्रेसने आम्हाला शिकवू नये कारण केरळमध्ये काँग्रस देखील मुस्लिम लीग सोबत गेलीय ते पहावं अशी घणाघाती टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली.
भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयाची घसरण –
सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वाढत चालली आहे याला सर्वस्वी संघ आणि भाजपाचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याची टीका करत ज्यांनी इतर मार्गाने जी संपत्ती कमावली आहे अशी ३ लाख ३ हजार ४०० कुटुंबांपैकी ७५ हजार कुटुंब आता हा पैसा डॉलरमध्ये रुपांतरीत करत भिती पोटी आता देश सोडून जात आणि याला सरकारचे हे चुकीचे धोरणच कारणीभूत असल्याचे प्रकाश आंबेडकर आहेत तसेच ही थलांतरीत होणारी कुटुंब हिंदू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच या अशा लोकांमुळे सध्या डॉलरचे डिमांड वाढले असून, रुपयाची किंमत कमी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर या ३ लाख ३ हजार ४०० कुटुंबांपैकी किती कुटुंबे भारतात राहतील ही देखील शंका आहे. तसेच या असल्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा एकदा सोनं गहाण ठेवावे लागते का? अशी भिती वाटू लागल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणालेत. तसेच २०१८ ला फॉरेन्स एक्सचेंज ४२६ कोटी डॉलर होते ते जून २०१८ ला ३८०.७ कोटी डॉलरवर खाली आले आहे. तसेच आता या देशातील ५० हजार कोटी रुपये डॉलरमध्ये रुपांतरीत केले जाऊ शकतील अशी शक्यता आहे आणि तसे झाले तर डॉलरची किंमत १०० रुपयांपर्यंत जाऊ शकते असे देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणालेत.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *