Breaking News

देशात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली, विक्रीत २३४ टक्के वाढ या चार कंपन्यांच्या गाड्य़ांना मागणी

मुंबईः प्रतिनिधी
भारतात इलेक्ट्रिक कार (EV) वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३४ टक्केची वार्षिक वाढ दिसून आली. यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करत आहेत. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्या FAME-II अनुदानानंतर इलेक्ट्रिक कार स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.
इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल सेगमेंट अजूनही त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या कारची मागणी वेगाने वाढत आहे. काही कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या सहामाहीत ६,२६१ कारच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. भारतात एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान विकल्या गेलेल्या १८७२ युनिट्सपेक्षा ही विक्री २३४ टक्के जास्त आहे. या विभागातील आघाडीवर असलेल्यांमध्ये Tata Motors (Nexon आणि Tigor EV), MG Motors (ZS EV), Hyundai (Kona) आणि Mahindra (Verito) यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये इलेक्ट्रिक कारची एकूण विक्री ५,९०५ होती.
टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्ही या दोन मॉडेल्ससह ईव्ही स्पेसवर वर्चस्व कायम राखले आहे. Tata Motors ने गेल्या महिन्यात भारतात पुढील ५ वर्षात आणखी १० इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा खुलासा केला होता. यासाठी कंपनीने ७,५०० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. येत्या ४ वर्षात किमान ७ कार लॉन्च होतील. Tata Nexon EV हे या विभागातील सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. त्याचा बाजारातील हिस्सा ५८ टक्के आहे. एप्रिल-सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण ३,६१८ युनिट्सची विक्री झाली.
MG ZS EV एप्रिल-सप्टेंबर २०२१ मध्ये १,७८९ युनिट्स विकून दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी याच ६ महिन्यांच्या कालावधीत विकल्या गेलेल्या ५११ युनिट्सच्या तुलनेत २५० टक्के वाढ झाली आहे.
एप्रिल-सप्टेंबर २०२१ मध्ये ८०१ युनिट्सच्या विक्रीसह Tata Tigor EV क्रमांक 3 वर होता, एप्रिल-सप्टेंबर २०२० या कालावधीत विकल्या गेलेल्या १०० युनिट्सपेक्षा ७०१ टक्के वाढ झाली आहे.Tigor EV या वर्षाच्या सुरुवातीला अधिक चांगली बॅटरी आणि अपडेट केलेल्या वैशिष्ट्यांसह अपडेट करण्यात आली होती. ही ५ सीटर सेडान ४ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि तिची किंमत ११.९९-१३.१४ लाख रुपये आहे.

Check Also

जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट

सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *