Breaking News

व्यावसायिक नाट्य स्पर्धेत “सोयरे सकळ” प्रथम सांस्कृतिक विभागाची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
३१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही घोषणा केली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे-
जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या हॅम्लेट या नाटकास रु. ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या आरण्यक या नाटकास रु. ३ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (रु.१ लाख ५० हजार/-) चंद्रकांत कुळकर्णी (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.१ लाख /- आदित्य इंगळे (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.५० हजार /-) अद्वैत दादरकर (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट)

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (रु.१ लाख /-) डॉ.समीर कुलकर्णी (नाटक-सोयरे सकळ)

द्वितीय पारितोषिक (रु.६० हजार /-) रत्नाकर मतकरी (नाटक-आरण्यक)

तृतीय पारितोषिक (रु.४० हजार /-) दिग्पाल लांजेकर (नाटक-ऑपरेशन जटायू)

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) शितल तळपदे (नाटक-आरण्यक)

नेपथ्य : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) संदेश बेंद्रे (नाटक-ऑपरेशन जटायू)

संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) राहूल रानडे (नाटक-हॅम्लेट)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) अजित परब (नाटक-सोयरे सकळ)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) कौशल इनामदार (नाटक-आरण्यक)

वेशभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) गीता गोडबोले (नाटक-सोयरे सकळ)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) मेघा जकाते (नाटक-आरण्यक)

रंगभूषा : प्रथम पारितोषिक (रु.४० हजार /-) सचिन वारीक (नाटक-सोयरे सकळ)

द्वितीय पारितोषिक (रु.३० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-हॅम्लेट)

तृतीय पारितोषिक (रु.२० हजार /-) उल्लेश खंदारे (नाटक-आरण्यक)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.५० हजार /-

पुरुष कलाकार : भरत जाधव (नाटक-वन्स मोअर), प्रशांत दामले (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (नाटक-हॅम्लेट), उमेश कामत (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (नाटक-अ परफेक्ट मर्डर)
स्त्री कलाकार : ऐश्वर्या नारकर (नाटक-सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (नाटक-तिला काही सांगायचय), ऋता दुर्गुळे (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (नाटक-आरण्यक), माधूरी गवळी (नाटक-एपिक गडबड)
६ मे ते २० मे या कालावधीत दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षिरसागर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *