Breaking News

कॉ.पानसरे तपासप्रकरणात मुख्यमंत्र्यांवर ताशेरे नाहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी

दाभोळकर-पानसरे यांच्या हत्येची चौकशी सीबीआय आणि सीआयडीकडून सुरु असून याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. कॉ.पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणतेही भाष्य केले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कॉ.पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील तपासप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना केला.

महाराष्ट्र एका मोठ्या दुष्काळातून वाटचाल करत आहे. विरोधकांकडून योग्य त्या सूचना प्राप्त झाल्या. जलयुक्त शिवार योजनेवर मोठी चर्चा केली. ही योजना यशस्वी राबविल्याने दुष्काळाची झळ कमी करू शकलो. २०१२ साली ९१ टक्के पाऊस झाला. १२८ लाख मेट्रीक टन उत्पादन झाले. ७० टक्के पावसात ११५ लाख मेट्रीक टन उत्पादन. २०१६ ९५ टक्के पाऊस १७५ टक्के उत्पादन झाले. पावसावरच शेतीच अलंबित्व कमी करतोय.

या योजनेत भ्रष्टाचाराला वावच नाही. जनता, विरोधी-सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि सरकार या सर्वांनी मिळून ही योजना यशस्वी केल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

ग्रामीण भागात ९५ हजारात शेततळे देत असून गावपातळीवरही तळे तयार करण्यासाठी मान्यता देण्याचा विचार आहे. १९२ कोटींचा निधी छावण्यासाठी देत १६०१ चारा छावण्या सुरु आहेत. ३८७  आणि ११४ कोटी रूपये असे मिळून जवळजवळ ५०० कोटी रूपये कांद्याच्या अनुदानाला द्यायचे आहेत. यापूर्वी ६० ते ७० कोटी रूपयांचे अनुदान दिले जात होते अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

८५ टक्के शेतकरी १ लाख ५० हजार रूपयांच्या आतील कर्जदार आहेत. कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पोलिसांसाठी घरे बांधण्याची योजना अभूतपूर्व सुरु आहे. त्यांच्यासाठी १ लाख घरे बांधण्याची योजना तयार केली आहे. ५२७ कोटी रूपये पोलिसांना बिगर व्याजी रक्कम उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जून्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुर्नवसनाबाबतचा प्रश्न १५ दिवसात तोडगा काढून मार्गी लावणार असून एसआरएतंर्गत घरे देण्याच्या प्रश्नी नियमात दुरूस्ती करण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याला लागून असलेल्याना घरे देणार. आदीवासींच्या पुर्नवसनासाठी दोन प्रकल्प राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान आवास योजना आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून गृहनिर्माण योजना राबवित आहेत. २०११ पूर्वीचे अतिक्रमण नियमित करण्याचा प्रयत्न असून ३ लाख अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याचे काम सुरु आहे. १५ ऑगस्ट पर्यंतच सर्वांचे केले जाईल. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३० हजार कि.मी.चे रस्ते तयार केले. यासह २६ ते २७ हजार कि.मीच्या रस्त्यांना नव्याने मंजूरी दिली. याबाबत देशातील एकमेव राज्य ठरल्याचे त्यांनी सांगितले.

अरबी समुद्रातील स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. उच्च न्यायालयाने याप्रकरणी आपल्या बाजूने निकाल दिला असून सर्वोच्च न्यायालयाने मात्र स्थगिती दिली आहे. देशाचे अँटर्नी जनरल यांना वकिली करण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ४५० फुटाचा राहणार असून त्याच्या उंची वाढीस आपण नुकतीच मान्यता दिली. तसेच हे स्मारक ६ डिसें. २०२० मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *