Breaking News

प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कॉलेजमधील १०० टक्के उपस्थितीचा निर्णय रद्द : वाचा नवा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील सर्व काँलेजमधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आस्थापना कार्यालयात १०० टक्के उपस्थित रहावे असे आदेश राज्य सरकारने काही दिवसांपुरते दिले होते. मात्र त्यावर सर्वचस्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्याने अखेर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेत परिक्षेच्या कालावधीत आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करत इतरांना त्या त्या वेळेनुसार काम करण्यास सवलत देण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्चव तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

काँलेजमधील सर्वांना १०० टक्के उपस्थित राहण्यासंदर्भात राज्य सरकारने नुकताच निर्णय जाहीर केला होता. परंतु त्यावर विविध प्राध्यपकांच्या संघटनांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नसताना १०० टक्के उपस्थिती नोंदविण्याच्या आदेशाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यासंदर्भात राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली. त्यावर अखेर सरकारने तो निर्णय मागे घेतला असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Check Also

१४, २३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या या तारखेला प्रसिध्द होणार राज्य निवडणूक आयोग लागले निवडणूकीच्या कामाला

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरालीत १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *