Breaking News

राणेची जबाबदारी आमच्यावर तर खडसे प्रस्थापित नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट कबुली

नागपूर : प्रतिनिधी

मागील अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावराबरोबरच एनडीएचे घटक पक्ष बनलेले नारायण राणे आणि भ्रष्टाचारासह विविध आरोपावरून मंत्रीपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांच्या समावेशाबाबत चर्चा सुरु आहे. त्यानुसार विस्थापित असलेल्या नारायण राणे यांची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. तर मंत्री पदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते असल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुर्न: प्रवेशाची शक्यता अप्रत्यक्षरित्या फेटाळून लावली.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून नागपूरला आलेल्या पत्रकारांशी सुयोग येथे संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील स्पष्ट कबुली दिली.

यंदाच्या अधिवेशनात एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही सातत्याने राज्य सरकारच्या धोरणावर सातत्याने विधानसभेत हल्ला चढवित आहेत. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार का? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले. त्यावर पुढील अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजेच असे सांगत त्यामध्ये विस्थापितांना स्थान मिळणार असल्याचे संकेत देत नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला दुजोरा दिला.

कोकणात येवू घातलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीला सध्या शिवसेनेकडून विरोध होत असला तरी ही रिफायनरी आणण्यासाठी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले. तसेच ही रिफायनरी ग्रीन ग्रीन रिफायनरी असल्याने यातून प्रदुषण होणार नसून त्याचा परिणाम समुद्रातील वन्यजीवांवरही होणार नाही. मुंबईतील आणि चेन्नईतील काही एनजीओकडून जाणीवपूर्वक रिफानरीजच्या विरोधात वातावरण निर्माण करून आंदोलन केले जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

याचबरोबर गुजरात विधानसभेच्या निकालावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २२ वर्षानंतरही गुजरातमधील ५० टक्के जनतेने भाजपवर विश्वास दाखविला आहे. तसेच पॉलिटीकली अर्थमँटीकनुसार भाजपच्या मतांमध्येही दिड टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने गुजरातमधील विजय एकहाती विजय आहे.

Check Also

“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *