Breaking News

मुंबईकरांची हालत धोबी का कुत्ता न घर का ना घाट का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकांवर आरोप

मुंबई: प्रतिनिधी

मुंबई शहरात परवडणाऱ्या घरांची कमतरता असून जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास होणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील विकासाला परवानग्या देण्याचा बिकट प्रश्न असल्याने विकासकांनी मुंबईकरांची हालत म्हणजे धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी अवस्था करून ठेवल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबै बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वपुर्नविकास या योजनेच्या शुमारंभाचा कार्यक्रम नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील आरोप केला. यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, संचालक प्रसाद लाड आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आदी उपस्थित होते.

मुंबई मध्ये विकासाला परवानग्या हा बिकट प्रश्न असल्याने तो सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व प्राधिकरणाच्या परवनाग्या एसओपी तयार करून एक खिडकी सिस्टीमच्या माध्यमातून देण्याचे सुरु करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने म्हाडाचे सीईओ मिलिंद म्हैसकर यांना सूचना करत असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले.

स्वयंविकासासाठी लोक एकत्र येत असतील तर ते आपली रोजची कामं सोडून येऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या सुलभतेसाठी हा निर्णय आवश्यक आहे. या योजनेसाठी म्हाडाला प्लॅनिंग अँथोरिटी करण्याचा विचार असून परवानग्यासाठी अनेक प्राधिकरणाकडे जाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

म्हाडा आणि मुंबई बँकेने स्वयंविकास करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करावेत अशी सूचना करत मुंबई बँकेच्या स्वयंविकास योजनेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

खरा मुंबईकर कोण याची चर्चा मी कायम ऐकत असतो. तसेच खऱ्या मुंबईकरांसाठी आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचे सांगत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला राजकिय टोला लगावला.

सीआरझेड आणि इको-सेन्सिटीव्ह झोन बाधित आणि रेल्वे, विमानतळ फनेल बाधित गृहनिर्माण संस्थांबाबत निर्णय घेतला तर मुंबईकरांना मोठा न्याय मिळेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतही निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *