Breaking News

स्वतंत्र लस खरेदी करण्यास महाराष्ट्राला परवानगी द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी

तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेचा सामना करण्यापूर्वी राज्यातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण योजना राबवायची आहे. महाराष्ट्राला आवश्यक लागणाऱ्या लसींची एकदमच खरेदी करण्याचा विचार असून त्यादृष्टीने राज्यांनां स्वतंत्र लस खरेदी करण्याची परवानगी दिल्यास लसीकरण मोहिम अधिक सक्षमपणे राबविणे शक्य होणार असल्याने सध्याच्या दोन लस उत्पादक कंपन्याशिवाय अन्य कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली.

केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यास परवानगी दिली. तसेच या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र लसींसाठी राज्यांना केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने एकदमच लसींचा साठा खरेदीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र राज्य सरकारच्या मागणीनुसार लसींचा पुरवठा करण्यास सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्या सक्षम नसल्याने तिसऱ्या अन्य कंपनीकडून लस खरेदी करण्यास राज्यांना परवानगी द्यावी आणि जागतिक दर्जाच्या अन्य कंपन्यांकडून लस खरेदी करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या एफडीएसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली.

याशिवाय केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यास परवानगी दिल्यानंतर केंद्राच्या कोविन अॅपवर नावे नोंदविण्यासाठी एकच ऑनलाईन गर्दी झाली. त्यामुळे नाव नोंदविण्याच्या पहिल्याच दिवशी कोविन अॅप क्रॅश झाले. त्यामुळे या गोष्टी वारंवार होवू शकतात त्यामुळे प्रत्येक राज्यांना त्यांच्या राज्यातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यास परवानगी द्यावी अशी सूचनाही त्यांनी पंतप्रधानांना केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *