Breaking News

राज्य मंत्रिमंडळात झाली या मुद्यावरून वादळी चर्चा राजकिय कुरघोडी करण्याच्या नादात मंत्र्यांमध्ये तू तू मै मै

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील जनतेच्या विकासाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी काल बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या वाटपावरून चांगलीच खडाजंगी झाली असून वित्त विभागाच्या धोरणामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये चांगलीच तू तू मै मै झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
काँग्रेसच्या मंत्र्यांकडून काही नव्या योजनांना मान्यता मिळविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर साधक-बाधक चर्चा होण्याऐवजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेस मंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला वित्त विभागाकडून विरोध करण्यात आला. तसेच निधी देण्यासही नकार दिला. त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांनी वित्त विभागाच्या या धोरणावर जोरदार आक्षेप घेत त्याविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच वित्त विभागाकडून अशा पध्दतीने नेहमीच काँग्रेस मंत्र्यांनी मांडलेल्या धोरणाला विरोध करण्यात येत असल्याचा आरोप मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वित्त विभागाकडून काँग्रेसच्या मंत्र्याबाबत असेच धोरण राहीले तर एक दिवस सरकार चालविणे अवघड होईल असा इशाराही एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित दिला. त्यानंतर शिवसेनेच्या एका मंत्र्याने हस्तक्षेप करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसच्या काही मंत्र्याने मुख्यमंत्र्यांनी यावर काही तरी बोलावे अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचे त्यांनी केले.
या खडाजंगीतच अखेर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपविण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना बोलावित त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *