Breaking News

“त्या” प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या डावामागे केंद्राच काळंबेरं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आरोप

मुंबई प्रतिनिधी

ॲटांलिया बंगल्यासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच बोलत “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच असते. स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे, प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो, तोदेखील आमच्याकडे आहे आणि म्हणून एटीएसकडे हा तपास दिला आहे. पण एनआयएकडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही” नसल्याचा इशारा दिला.
मोहन डेलकर प्रकरणाचा तपास करणार-
त्याचप्रमाणे राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने सिलवासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे. हा विषय पण गंभीर आहे पण कदाचित याविषयी बोलण्यासाठी विरोधी पक्षाला तोंड नाही. केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अख्त्यारित येतो हे तुम्हाला माहित आहे. सात वेळा निवडून आलेल्या खासदाराने मुंबईत येऊन आत्महत्या करावी हे तिथल्या प्रशासनाला लांछनास्पद आहे. सुसाईट नोट सापडली असून काही उल्लेख आहेत. उल्लेख आहेत त्यांची चौकशी केली जाईल आणि कितीही मोठा असला तरी शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही असा गर्भित इशाराही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला.

सरकार येतं आणि जातं पण मूळ यंत्रणा बदनाम करता कामा नये. सध्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. महाराष्ट्रात काही व्यवस्थाच नाही आणि सगळं काही केंद्राच्या अख्त्यारित आहे असं दाखवत आहेत. तसं असेल तर इंधन दरवाढीचा मुद्दाही त्यांच्या पदरात टाका असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री होते त्यांचा सरकारवर विश्वास नाही. पण दुर्दैवाने मोहन डेलकर यांनी येथील सरकार योग्य ती चौकशी करेल आणि आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांना शासन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *