Breaking News

मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना दिली गुड न्युज तर मराठा समाजाला केले मोर्चे न काढण्याचे आवाहन भाजपाला मात्र इशारा

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आतापर्यत नियंत्रणात असलेली कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार दुसरी लाट येणार आहे का? कि आली आहे हे आताच सांगणे अवघड आहे. मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण महाराष्ट्रात चांगलाच वाढत आहे. त्यातच आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता पुन्हा आपल्यासमोर आला आहे. या प्रश्नाची सोडवून करण्यासाठी राज्य सरकार वचनबध्द असल्याने मराठा समाजाने कोणेतेही मोर्चे, आंदोलने काढू नयेत असे आवाहन करत मुंबईकरांसाठी महत्वाची असलेली जीवन वाहीनी लोकलमधून आतापर्यत काही वर्गांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात आणखी वर्गांचा समावेश आपण लवकरच करत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.

मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत गंभीर इशारा दिला. त्यातच आता मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नव्याने राजकिय आणि सामाजिक प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते ऑनलाईन पध्दतीने राज्यातील जनतेशी संवाद साधताना बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्याच्या विधीमंडळाने एकमताने ठराव पारित करून आरक्षण दिले. उच्च न्यायालयात आपण याबाबत जिंकलो. सर्वोच्च न्यायालयातही काहीजणानी विरोधात याचिका दाखल केली. त्यावर राज्य सरकारने याप्रश्नी मोठ्या खंडपाठीसमोर यावर सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयानेही ही सरकारची मागणी मान्य केली. परंतु ही मागणी मान्य करता कारण नसताना आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. परंतु, आरक्षणाबाबत जी मराठा समाजातील प्रत्येकाची जी भावना आहे तीच भावना राज्य सरकारची आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळवून देण्यास राज्य सरकार वचनबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्यानुसार एक हजाराच्या आत ही संख्याही ठेवण्यात आली. मात्र त्यात आता पुन्हा वाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आदी भागातही संख्या वाढत आहे. आपण हळुहळू राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. त्या अनुषंगाने आंतरजिल्हा प्रवासाला मान्यता दिली, बाजारपेठा सुरु केल्या. मुंबईत लोकलने प्रवास करायला काही वर्गाला परवानगी दिलीय आणखीही काही वर्गांना प्रवास करण्यास मान्यता देणार असून लोकलच्या फेऱ्या वाढविणार असल्याचे सांगत मुंबईकरांसाठी लवकरच लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर खुली होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

राजयात मिशन बिगेशन अंतर्गत अनेक गोष्टींना सुरुवात केली. परंतु राज्यातील काहीजणांना कोरोना संपला सारखे वाटल्याने त्यांनी पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात करत महाराष्ट्राला बदनामी करण्याचा घाट घालण्यास सुरुवात केली. मात्र मी त्यावर आताच बोलणार नाही. माझ्याकडे त्याची उत्तरे नाहीत म्हणून गप्प नाही. तर मला चांगले करायचेय म्हणून मी गप्प आहे. त्या राजकारणावर एकेदिवशी मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेवून त्यावर बोलेन असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला इशारा दिला.

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी एक महिनाभरासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबविणार असून यात सरपंचापासून ते आमदार, खासदारापर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करत यात प्रत्येक नागरिकांने सहभावी व्हावे असे आवाहन केले. तसेच हे युध्द असून प्रत्येकाला यात खारी, सिंहाचा वाटा उचलण्याची जबाबदारी घ्यावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *