Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंकडून भंडारा रूग्णालयाची पाहणी: पीडीत कुटुंबियांचे केले सांत्वन अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भंडारा: प्रतिनिधी

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज भंडारा येथे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी नागपूरहुन भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दांपत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत विधानसभाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे ही उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगदळे (Fire Brigade chief P.S.Rahangdale) यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत.

भंडार्‍याच्या भोजापुर येथील सोणझरी वस्तीला भेट देऊन कुटुंबीयांचे  सांत्वन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेतील गीता विश्वनाथ बेहरे यांच्या सोणझरी वस्तीत असलेल्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच तुमसर तालुक्यातील सालेकसा येथील कविता बारेलाल कुमरे या महिलेला भेटून या दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन केले. घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे आपल्या दुःखात मी सहभागी आहे. शासन आपल्या सोबत असल्याची यावेळी त्यांनी सागितले.

Check Also

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *