Breaking News

लोणकर कुटुंबियांची भेट घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले हे आश्वासन स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

एमपीएससी परिक्षा, कोरोनामुळे सतत होणारा लॉकडाऊन आणि त्यामुळे सर्व गोष्टी ढकलण्यात येत असलेले कामकाज यापार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट घेत  ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’अशा शब्दांत स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. वास्तविक पाहता लोणकर कुटुंबियांची भेट यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घ्यायला हवी होती. परंतु अखेर उशीराने का होईना आज भेट घेतली.

स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई सौ. छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह अनेक राजकिय नेत्यांनी भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट घेतली. मात्र त्याच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तर कधी आणि कोणाकडून मिळणार हा प्रश्न आताही अनुत्तरीतच रहात आहे. त्यामुळे कोरोनाचे ठिक आहे पण त्यामुळे सर्वांनाच सामोरे जावे लागत असलेल्या मानसिक, आर्थिक आरिष्टांचे आव्हानाला कसे सामोरे जायचे ?

Check Also

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *