Breaking News

…आणि मुख्यमंत्र्यांनी टाळले राजभवनात जाणे महालक्ष्मी रेसकोर्सवरून घेतले टेक ऑफ

मुंबईः विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यापासून हाकेच्या अंतरावरील राजभवनातील हेलिपॅडचा वापर करणे सोयीचे असतानाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल गुरूवारी झालेल्या घटनेची पुर्नःवृत्ती नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजभवनातील हेलिपॅडचा वापर करण्याचे टाळत महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमान वारण्यास परवानगी नाकारल्यानंतर राजभवनातील हेलिपॅड वापरण्यासही आपणाला नकार घंटा मिळू शकते म्हणून डहाणू-पालघर दौऱ्यासाठी रेसकोर्सवरील हेलीपऍडवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरने टेकऑफ घेणे पसंत केले.
शासकीय नियमाप्रमाणे सरकारी विमान, हेलिकॉप्टर वापरण्यासाठी राजशिष्टाचार विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. राज्यपालांकडून जर या दोन्हीपैकी एका सेवेचा वापर करण्यात येणार असेल तर राजभवनच्या जबाबदार अधिकाऱ्याकडून मुख्यमंत्री कार्यालयास कळवण्यात येते किंवा राज्यपाल स्वतः बोलतात मुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलतात, अशी माहिती राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अगदी त्याच धर्तीवर राजभवनातील हेलिपॅडचा वापर करायचा असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून राजभवनातील जबाबदार अधिकाऱ्यांशी किंवा मुख्यमंत्री स्वतः राज्यपालांशी थेट बोलतात. त्यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्या नियोजित डहाणू-पालघर दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र काल गुरूवार पासून राज्यपाल हे उत्तराखंड येथेच असल्याने तेथील हेलिपॅडच्या वापरासाठी राजभवनातील अधिकाऱ्याशी किंवा दस्तुरखुद्द राज्यपालांशी बोलावे लागणार होते. परंतु राजभवनकडून घटनेची पुर्नःवृत्ती होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्र्यांनी राजभवनाशी संपर्क साधणे टाळत रेसकोर्सचा पर्याय निवडल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *