Breaking News

ठाकरे सरकारकडून २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई आणि मंत्रालयातील बहुतांष अधिकारी बाहेरच्या नियुक्तीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून आता स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. या वाटचालीचा भाग म्हणून मुंबई, मंत्रालयासह राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची बदली समाज कल्याण आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. तर विक्रीकर विभागाचे प्रधान सचिव राजीव जलोटा यांची ग्रामविकास खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.के.एच.गोविंदराज यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदी तर बी.वेणूगोपाल यांची वन विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक पदी मागील चार वर्षे एका आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना हटवून सिंधूदुर्गचे जिल्हाधिकारी डी.डी.पांढरपट्टे यांची नियुक्ती त्यांच्याजागी करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या २२ सनदी अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे
1) श्रीमती जे मुखर्जी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई
2) एस ए तागडे, प्रधान सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग यांची बदली प्रधान सचिव वस्त्रोद्योग
3) डॉ. के एच गोविंदराज प्रधान सचिव वस्त्रोद्योग यांची बदली अतिरिक्त महानगर आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
4) बी. वेणुगोपाल रेड्डी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ यांची बदली प्रधान सचिव वने
5) राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास
6) संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई
7) असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा
8) प्रवीण दराडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त समाज कल्याण पुणे
9) श्रीमती शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई
10) पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
11) श्रीमती श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे
12) दीपक सिंगला आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गडचिरोली
13) डी डी पांढरपट्टे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची बदली महा संचालक माहिती व जनसंपर्क मुंबई
14) शेखर सिंग जिल्हाधिकारी गडचिरोली यांची बदली जिल्हाधिकारी सातारा
15) मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची बदली जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर
16) मिलिंद शंभरकर आयुक्त समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर
17) आर बी भोसले जिल्हाधिकारी सोलापूर यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण
18) श्रीमती नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांची नियुक्ती आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
19) डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे
20) आर एस जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर या पदावर
21) श्रीमती भुवनेश्वरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा या पदावर
22) मदन नागरगोजे यांची बदली संचालक माहिती व तंत्रज्ञान मुंबई

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *