Breaking News

राज्यातले सरकार हे अंहकारी, तुघलकी निर्णय घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात अघोषित आणीबाणी असून विरोध करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांचा सर्रास वापर करत आहे. आमच्या व्यक्तीने एखादी पोस्ट टाकली तरी त्या व्यक्तीला धमकावलं जातयं, त्याच्यावर पोलिसी कारवाई केली जाते. अर्णव गोस्वामी, कंगणा राणावत प्रकरणी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने आणि दिलेला निकाल हा राज्य सरकारला चपराक लगावणारा आहे. त्यात तोंड दाखवायला सरकारला जागा शिल्लक नाही. मात्र सत्ता डोक्यात गेल्याने अहंकार निर्माण झाला असल्याने हे सरकार अहंकारने आणि तुघलकी पध्दतीने एकांगी निर्णय घेणारे सरकार बनल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत केवळ या कारणामुळे राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.  परंतु हे फार काळ चालणार नसून जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळी आम्ही त्यांना जाब विचारू असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे इतर अनेक नेते उपस्थित होते.

हे सरकार चर्चेपासून पळ काढणारे असून राज्यातील दु:खांवर जनतेच्या संकटावर आणि अडचणींवर चर्चा करायला तयार नाही. चर्चा करायची नसल्यानेच राज्य सरकारने दोन दिवसाचे अधिवेशन घेत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. तिबार पेरणीचे संकट ओलावले आहे. अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले पीक रोगराईमुळे ते ही गेले आहे. या पिकांचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. सरकारने २५ हजार ते ५० हजार मदत देण्याचे जाहीर आश्वासन देवूनही अशी कोणतीही मदत न देता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप त्यांनी केला.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची संख्या महाराष्ट्रात आहे. कोरोनाची लाट देशात कमी झालेली असताना महाराष्ट्रात बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या आजही सर्वाधिक आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टीच्या आधारे सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे असा सवाल त्यांनी केला.

कोरोनाच्या या काळात महापालिकेकडून आणि कोरोना सेंटरसाठी लागणाऱ्या सर्वच कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यातील महिलांवरील अत्याचारात वाढ झालीय त्यास रोखण्यासाठी शक्ती कायदा आणण्यात आला. मात्र हे विधेयक अधिवेशनात आणणार का, या विधेयकावर किती काळ चर्चा घेणार याबाबत सरकारचे कोणतेच धोरण नसल्याचे सांगत हा महत्वाचा कायदा असल्याने यावर सविस्तर चर्चा सरकारने घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली नसल्याने हा प्रश्न गंभीर झाला असून आरक्षणापासून मराठा समाजाला लांब ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत देशातील फक्त तामीळनाडू आणि केरळ राज्यातील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगत राज्य सरकारच्या ठाम भूमिके अभावी ही वेळ आल्याचे आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी समाजामध्ये सरकारमधील मंत्रीच भीतीदायक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप ते म्हणाले की, एकाने विरोध करायचा दुसऱ्याने समर्थनार्थ बोलायचे असे करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम सरकारमधील मंत्री काम करत आहेत. त्याचबरोबर मोर्चेही काढत आहेत. मंत्र्यांना मोर्चे काढण्याचे अधिकार नसतात अशी बाबही त्यांनी निदर्शनास आणून देत नाट्य तयार करण्याचे काम सरकारमधील मंत्र्यांकडून सुरु असल्याची टीका त्यांनी केली.

कांजूर मार्गला मेट्रो शेड नेल्याने सरकारच नुकसान होणार असल्याचा अहवाल वन विभाग आणि नगरविभागाने दिलाय. मात्र त्याचा कोणताही अभ्यास न करता हे सरकार कारशेड कांजूर मार्गला हलविले. त्यामुळे मेट्रो वेळेत मुंबईकरांना मिळणार नाही. त्याचा कालावधी वाढला असून ४ वर्षाने हा कालावधी वाढणार असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणे सुरु होतं. प्रचार सुरु होता त्यास सर्वच पक्षाचे नेते जात होते. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस झाला. त्यासही सर्वजण होते. असे असतानाही सरकारने दोन आठवड्याचे सरकार घेण्याऐवजी दोनच दिवसाचे घेण्याचे ठरविले. बाकिच्यावेळी कोरोना आठवत नाही आणि अधिवेशनाच्यावेळी कोरोना आठवतो हे अजब असल्याचे सांगत आर्श्चय व्यक्त केले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *