Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडे कल्पिता पिंपळे यांनी केली ही मागणी चिंता करू नका लवकर बरे व्हा हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

ठाणे : प्रतिनिधी

अनधिकृत फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सध्या ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोन केला, त्यावेळी कल्पिता पिंपळे यांनी हल्लेखोरास कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू…तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे..ताई तुम्ही काळजी करु नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका लवकरात लवकर बरे व्हा, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देतानाच तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांची विचारपूस केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून पिंपळे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हल्लेखोर अमरजित यादव सध्या पोलिसांच्या अटकेत असून त्याच्यावर लवकरच चार्जशीट दाखल करून न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *