Breaking News

राज्यातील उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधांना चालना विकासासाठी ३२ सांमज्यस करार करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या विकासाच्य आणि उद्योग वाढीच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी पूर्ण होत आली असून २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि रनवे तयार होणार आहे. तर मुंबईला राज्याच्या इतर भागाशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे कामही येत्या साडे चार वर्षात होणार असून विविध कंपन्यांसोबत ३२ सांमज्यस करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडियाच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, मुंबई विकास प्राधिकरणाचे  महानगर आयुक्तयु.पी एस मदान, माहिती तंत्रज्ञान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मेट्रोचे काम सुरु झाले असून येत्या पाच वर्षात मुंबईकरांसाठी दुप्पट वाहतुक क्षमतानिर्माण होणार आहे.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह, आर्टिफीशीयल इंटेलीजन्स तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठातून विशेष अभ्यासक्रम तयार करून शिकविण्यात  येणार आहे. शहर विकासासह ग्रामीणभागाच्या विकासासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी १ हजारगावांमधून काम सुरु आहे. यासाठी राज्य शासनाने स्वयंसेवा संस्थेमार्फत ३०० युवकांना दोन वर्षांसाठी करारबद्ध केले.  या शिवाय ज्या कार्पोरेट संस्था किंवा व्यक्तींना शासनाच्यासहयोगाने सामाजिक कार्य करावयाचे आहे त्यांच्यासाठी ‘सहयोग’ हा डिजीटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत अधिकाधिक  लोकांनी सहभागी  होण्याचे  आवाहनही  यावेळी  मुख्यमंत्र्यांनी  केले.  अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया अंतर्गत राज्यात बॅंकींग, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान, आणि इतर महत्वपुर्ण क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.  राज्यातील इज ऑफ डुइंग बिजनेस अंतर्गत या कंपन्यांना राज्यात उद्योग  उभारणी करण्यात सहकार्य  मिळाल्याचे त्यांनी शिष्टमंडळास आवर्जून सांगितले.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुस्लिम लीगबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांना असेल….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुस्लिम लीगशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहे. १९४२ साली जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *