Breaking News

महाजनादेश यात्रा झाली शासकिय यात्रा ? मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून भाजपाच्या यात्रेची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दैनंदिन शासकिय कार्यक्रम प्रसारमाध्यमांना कळावेत यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून त्याची माहिती देण्यात येते. मात्र शासकिय मुख्यमंत्र्यांचे शासकिय कार्यक्रम- बैठकांची माहिती देण्याऐवजी भाजपच्या राजकिय असलेल्या महाजनादेश यात्रेची माहिती मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना कळविण्यात येत असल्याने महाजनादेश यात्रा राजकिय असण्याऐवजी शासकिय झाली की काय अशी चर्चा मंत्रालयातच सुरु झाली आहे.
शासनस्तरावर राज्यातील जनतेच्या विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने विविध विषयांवर बैठका होत असतात. या बैठकांची माहिती मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून सातत्याने प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात येते. तसेच त्या बैठकांमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांनाही सोयीचे होते. तसेच मुख्यमंत्री हे राजकिय पक्षांच्या व्यक्तीला मिळत असल्याने त्यांचे राजकिय महत्व लक्षात घेवून त्यांना राजकिय सभा-कार्यक्रमांनाही जावे लागते. परंतु जनसंपर्क कार्यालय हे शासनाच्या अखत्यारीत असल्याने फक्त शासकिय कार्यक्रमांची माहितीच प्रसारमाध्यमातील व्यक्तींपर्यंत पोहोचविणे जनसंपर्क कार्यालयाचे काम असल्याचे मत माहिती व जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
तरीही २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर प्रत्येक महानगरपालिका, लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून निवडणूकीच्या निमित्ताने भाजपच्या प्रचारसभेला गेल्याची माहिती मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना दिली. अगदी त्याचधर्तीवर गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाच्यावतीने काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेत पूर्णवेळ सक्रीय आहेत. तरीही मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून महाजनादेश यात्रेचा राजकिय कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून प्रसिध्द करत असल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात येत असलेल्या महाजनादेश यात्रेच्या माहितीवरून ही यात्रा भाजपाऐवजी आता सरकारी यात्रा झाल्याचे म्हणावयास हरकत नाही असा उपरोधिक टोलाही मंत्रालयातील एका सचिवाने लगावला.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *