Breaking News

विमानावरून काय खुलासा राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने दिला माहित आहे का? जाणून घ्या काय दिले दोन्ही कार्यालयाकडून खुलासे दिले

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती

मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच संदेश

राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक १० फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता.  ही  मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे  अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी  जाता आले नाही.

वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने “या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.”

Clarification from the Governor’s Office

With reference to certain inaccurate reports appearing in media, it is clarified as under:

  1. The Hon’ble Governor of Maharashtra and Goa Shri Bhagat Singh Koshyari is scheduled to preside over the Official Programme of the Valedictory Function of the 122nd Induction Training Programme of IAS officers at the Lal Bahadur Shastri National Academy of Administration at Mussoorie, Uttarakhand at 1000 hrs on Friday, 12 February 2021.
  2. In this connection, the Governor was scheduled to depart from CSIM Airport Mumbai for Dehradun at 1000 hrs on Thursday 11th February 2021
  3. In preparation of the visit, the Governor’s Secretariat had written to Government of Maharashtra authorities seeking permission for the use of Government Aircraft by the Hon’ble Governor, well in advance on 2nd February 2021. The office of the Chief Minister was also informed.
  4. Today, on 11th February 2021, the Hon’ble Governor reached the CSIM Airport at 1000 hrs and boarded the government plane. However, the Hon’ble Governor was informed that the permission for the use of Government Aircraft had not been received.
  5. As directed by the Hon’ble Governor, tickets for Dehradun were booked for the Governor on a Commercial Aircraft leaving Mumbai at 1215 hrs immediately and accordingly, he left for Dehradun

Koshyari in Doon – Their aircraft was not available for some reason. I took another flight here

 

Check Also

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *